54th International Film Festival India Goa Dainik Gomantak
गोवा

54th IFFI: इफ्फीत ‘गाला प्रीमियर्स’चे आकर्षण कायम

54th IFFI: रसिकांसाठी मेजवानी : फॅरे, गांधी टॉक्स, हरी ओम हरी, रौतू की बेलीचे होणार सादरीकरण

दैनिक गोमन्तक

54th IFFI: यंदाच्‍या 54 व्या इफ्फीत ब्लॉकबस्टर चित्रपट आणि वेब सीरिज रसिकांच्या भेटीला येणार आहेत. यंदाही  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ ‘गाला प्रीमियर्स’ची बहुप्रतीक्षित दुसरी आवृत्ती सादर करणार आहे. रसिकांसाठी ही मोठी मेजवानी असेल.

महोत्सवाची मूलभूत तत्वे कायम राखत चित्रपटातील कलाकारांना प्रेक्षकांशी जोडण्यासाठी, जागतिक सिनेमॅटिक कलात्मकता साजरी करण्यासाठी आणि निवडक निखळ चित्रपट सादर करण्याच्या दृष्टीने ‘गाला प्रीमियर्स’ या विभागाची आखणी केली आहे.

सलमान खानद्वारा निर्मित आणि नवोदित कलाकार असलेला फॅरे (हिंदी), ए. आर. रेहमानचे संगीत आणि अरविंद स्वामी, विजय सेतुपती आणि अदिती राव हैदरी या प्रमुख कलाकारांचा गांधी टॉक्स (मूकपट), पंकज त्रिपाठी आणि पार्वती थिरुवोथू अभिनीत कडक सिंग (हिंदी), सिद्धार्थ रंधेरिया अभिनीत हरी ओम हरी (गुजराती),  नवाजुद्दीन सिद्दीकी अभिनीत रौतू की बेली (हिंदी), विजय राघवेंद्र अभिनीत ग्रे गेम्स (कन्नड) या चित्रपटांचे जागतिक प्रीमियर्स असतील.

शिवाय अमेझॉन ओरिजिनल्सच्या दोन सीरिज (तेलगू), नागा चैतन्य पार्वती थिरुवोथू प्रमुख कलाकार असलेली धुठा (तेलगू) आणि आर्य अभिनीत द व्हिलेज (तमिळ), तसेच अक्षय ओबेरॉय आणि उर्वशी रौतेला अभिनीत दिल है ग्रे (हिंदी), तरसेम सिंगचा डियर जस्सी (पंजाबी) या चित्रपटांचे आशिया प्रीमियर्स इफ्फीत होणार आहेत. ‘ए वतन मेरे वतन’ या चित्रपटानिमित्त करण जोहर आणि सारा अली खान यांच्यातील संभाषण खास आकर्षण असेल.

गाला प्रीमियर्समधील प्रतिभावान अभिनेत्यांचे मी स्वागत करतो. प्रख्यात तरसेम सिंगची उपस्थिती सिनेमहोत्सवाला नव्या उंचीवर नेईल. हे भव्य प्रीमियर्स ‘मेरी माटी मेरा देश’ या नव्या संकल्पनेशी मेळ साधत उत्तर, पूर्व, दक्षिण आणि पश्चिमेच्या मातीतील चित्रपट सादर करणार आहेत. आपण सर्वांनी एकत्र गोव्यात ही सिनेमाची जादू अनुभवूया.
- अनुराग ठाकूर, माहिती आणि प्रसारणमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

E-Waste: प्रत्येक नव्या खरेदीमागे जुन्या उपकरणांचा कचरा वाढतो, तोच ढीग गंभीर समस्या म्हणून उभा राहतो; ई-कचऱ्याचा विळखा

Super Cup: सुपर कपचा बिगुल! 25 ऑक्टोबरपासून रंगणार थरार; FC Goa समोर विजेतेपद राखण्याचे खडतर आव्हान

Goa Taxi: 'टॅक्‍सी ॲग्रीगेटर जबरदस्तीने लादणार नाही'! गुदिन्‍होंची हमी; सरकारकडे सुमारे 3500 सूचना, हरकती

Panaji: ‘बोर्डवॉक’ची पणजी महानगरपालिका दुरुस्ती करणार? 2 वर्षांपासून दुर्दशा; धोका असूनही नागरिकांचा वावर

Chandel Hasapur: सरपंचालाच मिळाली सरकारी नोकरी, पदासह दिला पंच सदस्यत्वाचा राजीनामा; चांदेल हसापूरमध्ये रंगणार रस्सीखेच

SCROLL FOR NEXT