CM Sawant Joined Karnataka assembly election campaigning  Dainik Gomantak
गोवा

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा शेवटच्या टप्प्यातील प्रचार थांबला

मुख्यमंत्री सावंत, मंत्री राणेंसह अनेक भाजप नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

दैनिक गोमन्तक डिजिटल

Karnataka Assembly Election 2023: कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा जाहीर प्रचार आज समाप्‍त झाला असून उद्या बुधवारी मतदान होत आहे. गेल्या 20-22 दिवसांपासून या निवडणुकीसाठी सक्रिय असलेले राज्यातील नेते आज, उद्या परतत आहेत.

प्रामुख्याने उत्तर कर्नाटकातील अनेक मतदारसंघांची जबाबदारी राज्यातल्या नेत्यांना दिली होती. त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून यात मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आरोग्‍यमंत्री विश्‍‍वजीत राणे यांच्याबरोबर अनेक आमदार आणि नेत्यांचा समावेश आहे.

लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. यात सत्ताधारी भाजपला सत्ता टिकवण्यासाठी मोठी कसोटी करावी लागणार होती, हे स्पष्टच होते.

त्यासाठी भाजपने केंद्रीय पातळीपासून स्थानिक, बूथ स्तरापर्यंत मोठ्या प्रमाणात नियोजन केले होते. हे नियोजन प्रत्यक्षात आणण्यासाठी देशभरातून हजारो कार्यकर्ते या निवडणुकीत उतरविले होते.

यासाठी केंद्रीय कोअर कमिटी गेले वर्षभर सक्रिय आहे. यात राज्यातील भाजप नेत्यांचा मोठा वाटा होता. काहींना प्रत्यक्ष मतदारसंघांची जबाबदारी देण्यात आली होती, तर काहींना अन्य जबाबदाऱ्या सोपविण्यात आल्या होत्या.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यावर बेळगाव शहरातील दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघाची जबाबदारी होती.

मुख्यमंत्र्यांनी आपल्या साखळी पालिकेची निवडणुकीची जबाबदारी पत्नी सुलक्षणा यांच्यावर सोपवून या मतदारसंघात भाजपचा जोरदार प्रचार केला, तर त्यांची पत्नी सुलक्षणा सावंत यांच्यावरही खानापूर मतदारसंघाची जबाबदारी होती.

आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांच्यावर अत्यंत प्रतिष्ठेच्या हल्याळ मतदारसंघाची जबाबदारी होती. गेल्या अनेक दिवसांपासून मंत्री राणे यांनी या मतदारसंघात तळ ठोकून तळागाळापर्यंत प्रचार केला.

या मतदारसंघात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा घेण्यात ते यशस्वी झाले आहेत. याशिवाय अनेक मोठ्या सभांना गर्दी जमवण्यात राणे यशस्वी झाल्याचे चित्र आहे.

कुणावर होती कोणती जबाबदारी?

डॉ. प्रमोद सावंत : बेळगाव शहरातील दक्षिण, उत्तर आणि ग्रामीण मतदारसंघ

विश्‍‍वजीत राणे : हल्‍याळ

सुलक्षणा सावंत : खानापूर मतदारसंघ

सदानंद शेट तानावडे : चिकमंगळूर

बाबू कवळेकर : बेंगलोर

नीलेश काब्राल : उत्तर कन्नड

दामू नाईक : बेळगाव ग्राम

अन्‍य नेतेही प्रचारात

समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्याकडे यल्‍लापूरची जबाबदारी होती. आमदार दाजी साळकर यांच्याकडे कुमठा, सिद्धार्थ कुंकळ्येकर यांच्याकडे सिरशी, आमदार प्रेमेंद्र शेठ यांच्याकडे कारवार, आमदार उल्हास तुयेकर यांच्याकडे भटकळ, माजी खासदार नरेंद्र सावईकर यांच्याकडे मेंगलोर ग्रामीण, सर्वानंद भगत यांच्याकडे बेळगाव शहर अशा जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या होत्या.

"कर्नाटकात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासाचा बोलबाला असून तेथील जनता पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला मोठ्या मताने निवडून देईल यात शंका नाही. या निवडणुकीनंतर कर्नाटकात 100 टक्के भाजपचे सरकार असेल."

- सदानंद शेट तानावडे, प्रदेशाध्यक्ष भाजप

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 15 September 2025: आर्थिकदृष्ट्या दिवस थोडा तणावाचा, विद्यार्थ्यांना अभ्यासात यश; प्रवासातून लाभ

India vs Pakistan: 'सूर्या' दादाला मिळालं वाढदिवसाचं गिफ्ट, हाय होल्टेज सामन्यात 'Sky'नं षटकार ठोकत पाकड्यांची जिरवली! 7 विकेट्सने चारली पराभवाची धूळ VIDEO

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

SCROLL FOR NEXT