Calangute Police Dainik Gomantak
गोवा

Calangute Crime News: कळंगुटमध्ये 'एवढ्या' लाखांचा गांजा जप्त, पोलिसांची मोठी कारवाई; पुढील तपास सुरु

Calangute Police: कळंगुट पोलिसांनी मूळचा ओडिशातील असणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल 2 लाखांचा 2 किलो 115 ग्रम गांजा जप्त केला.

Manish Jadhav

कळंगुट पोलिसांनी मूळचा ओडिशातील असणाऱ्या व्यक्तीकडून तब्बल 2 लाखांचा 2 किलो 115 ग्रम गांजा जप्त केला. बोडकेवड, कळंगुट येथे पोलिसांनी छापा टाकून ड्रग्ज प्रकरणात आरोपी बियंती गंथीरत्न माली याला ताब्यात घेतले. गोव्यात तो मधलेभाट शिवोली येथे राहत होता.

दरम्यान, शुक्रवारी ( 2 ऑगस्ट) रात्री पोलिसांनी ही कारवाई केली. बोडकेवड येथे ड्रग्जचा मोठा व्यवहार होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे पोलिसांनी ही कारवाई केली. बोडकेवड येथे एक तरुण संशयास्पदरित्या फिरत असल्याची दृष्टीस पडल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला पकडले. झडती घेतल्यास त्याच्याकडून तब्बल 2 लाखांचा 2 किलो 115 ग्रम गांजा मिळाला. त्यानंतर पोलिसांनी संशयित तरुणाला पोलिस स्थानकात आणून त्याच्याविरुद्ध एनडीपीएस कायदा 1985 अन्वये गुन्हा नोंदवून अटक केली.

पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पराग पारेख, हवालदार विद्यानंद आमोणकर, कॉन्स्टेबल अमीर गरड, भगवान पालयेकर, गणपत तिळोजी, राज परब व प्रणय गावस या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास करण्यात येत असल्याचे यावेळी पोलिसांकडून सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरे गुन्हेगार मोकाट, आमच्या मुलांना अटक का केली? नरकासूर प्रकरणी होंडा ग्रामस्थ एकवटले, पोलिसांना निलंबित करण्याची मागणी

ना भाकरीचा प्रश्न सुटला ना जीव वाचला; कोकण रेल्वेखाली सापडून दोन्ही पाय तुटले, ओडिशाच्या तरुणाचा गोव्यात मृत्यू

IND W vs NZ W: न्यूझीलंडविरुद्ध भारतीय ओपनर्सचा डबल धमाका! स्मृती मानधना-प्रतिका रावलने ठोकले शतक, रचला नवा इतिहास! VIDEO

Ind vs Aus 2nd ODI: 17 वर्षानंतर Adelaide मध्ये हरली टीम इंडिया! 2-0 ने मालिका ऑस्ट्रेलियाच्या खिशात

Goa Politics: दिल्लीतून पैसे घेतल्याची एक तरी सेटिंग सिद्ध करून दाखवा, RGP पक्षच बंद करू; तुकारामांचे 'मायकल'ना ओपन चॅलेंज

SCROLL FOR NEXT