Liquor business Dainik Gomantak
गोवा

Liquor Business in Goa: अजूनही धडधडताहेत ‘दारूभट्ट्या’

काजू व्यवसाय जोमात : डिचोलीत गावोगावी दारूचा घमघमाट

गोमन्तक डिजिटल टीम

Liquor Business in Goa: डिचोली तालुक्यात काजूपासून दारू गाळणीचा व्यवसाय जोमात सुरू असून, बहुतेक ठिकाणी अजूनही दारूभट्ट्यांवर धडधडाट आणि लगबग सुरू असल्याचे आढळून येत आहे.

दारू गाळणीचा व्यवसाय जोरात सुरू असल्याने गावोगावी अजूनही हुर्राक आणि फेणीचा घमघमाट सुटत आहे. संतुलित हवामानामुळे यंदा काजू पीक पूर्ण बहरात आले असून, अजूनही काजू व्यवसाय जोरात सुरू आहे.

संतुलित हवामान राहिल्यास काजू हंगाम संपेपर्यंत आणखी किमान दहा ते बारा दिवस हा व्यावसाय चालणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. तसा आशावादही काही काजू व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे.

यंदा काजू पीकही समाधानकारक आल्याने यंदा दारू उत्पादनात वाढ होणार असल्याची माहिती काही बागायतदारांकडून मिळाली आहे. गेल्या वर्षी अवकाळी पावसाचा काजू व्यवसायाला फटका बसला होता. त्यामुळे काजू हंगाम संपण्यापूर्वीच काजू व्यवसाय आटोपला होता.

कृषिप्रधान डिचोली तालुका हा काजू पिकाबाबतीत आघाडीवर आहे. तालुक्यातील नार्वे, पिळगाव, सर्वण, कारापूर, मेणकुरे, मये आदी काही गावे काजू व्यवसायात आघाडीवर आहेत. बहुतेक गावांतील माळराने, डोंगरमाथे काजूच्या झाडांनी व्यापलेले आहेत.

काजू पिकावर मिळणाऱ्या उत्पन्नातून बहुतेक कुटुंबांची वर्षभराची सहजपणे गुजराण होते. त्यामुळे बहुतेक बागायतदारांनी माळरानांसह भरड शेतजमिनीत काजू कलमांची लागवड केली आहे.

‘स्थानिकां’ना होतो फायदा

डिचोली तालुक्यातील बहुतेक म्हणजेच 80 टक्के काजू बागायतदार दारू व्यवसायात आहेत. त्यापैकी बहुतेक दारू व्यावसायिक स्थानिक बागायतींनी मिळणाऱ्या काजू बोंडूवर अवलंबून न राहता, सीमेलगतच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बोंडूंची आयात करतात.

महाराष्ट्रात काजू बोंडूंपासून दारू गाळण्यास बंदी असल्याने काजूबोंडूना योग्य भाव मिळत नाही. त्यामुळे स्थानिक काजू व्यावसायिकांचे आयतेच फावत आहे.

राज्याबाहेरून काजू बोंडूंची आवक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील माटणे, वजरे, चंदगड आदी काही भागातून डिचोलीत काजू बोंडूंची आवक करण्यात येते. सिंधुदुर्गातील काहीजण स्वतः थेट काजू बोंडूंचा पुरवठा करतात. डिचोलीत दरवर्षी जे दारू उत्पादन होते, त्यातील 40 ते 50 टक्के उत्पादन राज्याबाहेरील काजू बोंडूंपासून मिळते.

यंत्रांद्वारे काजू बोंडूची मळणी

एक काळ असा होता, की गावोगावी ‘कोळमी’वर पायाने काजू बोंडू मळण्यात येत होते. मात्र, गेल्या 25ते 30 वर्षांपासून या व्यावसायात आधुनिकता आली. मोठ्या प्रमाणात काजू बोंडू उपलब्ध होत असल्याने व्यावसायिकांनी यंत्रांचा वापर सुरू केला. आता तर बहुतेक व्यावसायिक यंत्रांद्वारे काजू बोंडू मळतात.

यंदा काजू पिकाचा हंगाम सुरळीत आणि समाधानकारक आहे. मध्यंतरी म्हणजेच गेल्या महिन्यात काही दिवस पीक कमी झाले होते.

पुन्हा काजूबोंडूंची आवक वाढली आहे. काजू हंगाम संपेपर्यंत दारू गाळणीचा व्यवसाय चालणार आहे. यंदा काजू आणि दारू उत्पादन समाधानकारक मिळण्याची आशा आहे.

- सोनू सावंत, व्यावसायिक, सर्वण

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai Goa Highway: पावसाचा कहर! मुंबई-गोवा महामार्गावर दिसली जखमी मगर, मुसळधार पावसाचा वन्यजीवांना धोका

Goa Live News: ... आणि मांजरीने घेतला छत्रीचा आसरा!

Horoscope: गजकेसरी योगाला मंगळाची साथ, 'या' 4 राशींना मिळेल धनलाभ आणि सन्मान

King Kohli journey,: 18 ऑगस्ट, 18 नंबर जर्सी! 17 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी सुरु झाला कोहलीचा ‘किंग’ बनण्याचा प्रवास; जाणून घ्या विराटचे रेकॉर्ड्स

MLA Disqualification Petition: गोव्यातील ‘त्या’ 8 आमदारांच्या भवितव्याचं काय? चोडणकरांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणार सुनावणी!

SCROLL FOR NEXT