Goa Fire
Goa FireDainik Gomantak

Bicholim Goa Fire: डिचोलीत घराला आग; कपडे, दागिने खाक

आठ लाखांची हानी: लग्न सोहळ्याच्या तयारीवेळीच कोसळली आपत्ती
Published on

House on Fire in Bicholim Goa: डिचोली शहरातील बंदरवाडा येथे एका घराला आग लागून, या आगीत कपडेलत्यासह वस्तूंसह सुवर्णालंकार आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. ही घटना काल (बुधवारी) घडली. या घटनेत लक्ष्मण हत्तीरीगर कुटुंबीयांचे सुमारे आठ लाख रुपयांचे नुकसान झाले.

ही आग नेमकी कशी लागली, हे स्पष्ट झाले नसले, तरी घराच्या मागच्या बाजूने पेटविलेल्या आगीची ठिणगी उसळून ही दुर्घटना घडल्याचा अंदाज आहे.

अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच आग नियंत्रणात आणल्याने मोठा अनर्थ टळला.घराला आग लागल्याचे लक्षात येताच, घरातील बायका-मुलांनी घराबाहेर धाव घेतली.

डिचोली अग्निशमन दलाला या घटनेची माहिती मिळताच दलाचे अधिकारी शैलेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तोवर अर्धेअधिक घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले होते.

Goa Fire
Bilawal Bhutto India Visit: नो शेकहँड, ओन्ली नमस्ते! बिलावल भुत्तोंचे जयशंकर यांनी असे केले स्वागत, पाहा व्हिडिओ

लग्नाच्या तयारीवेळीच आपत्ती

प्राप्त माहितीनुसार हत्तरीगर यांच्या मुलीचे लग्न ठरले आहे. पुढील पंधरा दिवसात कर्नाटकात लग्नसोहळा आयोजित करण्यात आला आहे. या लग्न सोहळ्याची तयारी चालू होती. वधूसाठी सोन्याचे दागिनेही तयार करून आणले होते.

अन्य ऐवजासह हे दागिने आगीत वितळून गेले, असे सांगून सुनंदा हत्तरीगर यांनी या आपत्तीमुळे आमच्यावर मोठे संकट ओढवले आहे, असे सांगितले.

Goa Fire
Inspirational: वामन सरदेसाईंचा लढाऊ बाणा प्रेरणादायी !

कपडेलत्ते, दागिने जळाले

मूळ कर्नाटक येथील हत्तरीगर कुटुंब गेल्या बऱ्याच वर्षांपासून बंदरवाडा येथे वास्तव्यास आहे. त्यांच्या घराला लागलेल्या आगीत घरातील सोन्याचे दागिने, महत्वाची कागदपत्रे, कपडेलत्ते आदीं महत्वाचा ऐवज जळून खाक झाला. या घटनेमुळे हत्तरीगर कुटुंब मोठ्या संकटात सापडले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com