Revolutionary Goans Dainik Gomantak
गोवा

'आरजी उमेदवारांचा जन्म क्रांतीतून, आम्ही लोकांचा विश्वासघात करणार नाही'

जाती-धर्माच्या या घाणेरड्या राजकारणाला आपण चिकटून राहिलो तर आपला देश कधीच समृद्ध होणार नाही; टिओटोनो कोस्टा

दैनिक गोमन्तक

5 फेब्रुवारी रोजी मडगाव आरजी पक्ष कार्यालयाचे उदघाटन मडगाव येथील प्रसिद्ध व्यापारी श्री इनासियो फर्नांडिस यांच्या हस्ते करण्यात आले. मडगावकरांना संबोधित करताना आरजी पक्षाचे मडगावचे उमेदवार शशीराज शिरोडकर म्हणाले की, आम्ही निवडणुकीच्या 4-5 महिने आधी सरकार तुमच्या दारी योजना घेऊन येणार नाही. कारण आम्ही 5 वर्षांच्या कार्यकाळात प्रत्येक महिन्यात तुमच्या दारी येणार आहोत.

पुढे ते म्हणाले शिक्षण, आरोग्य, कला, क्रीडा, पर्यावरण अश्या विविध क्षेत्रांतल्या विद्वानाकडे राज्यासाठी कल्पना आहेत. या कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी आरजी पक्ष पूर्ण पणे समर्थन करेल. राज्यात महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन आम्ही सुनियोजित कायदा व सुव्यवस्था राबवू. कचऱ्याची उत्तम पद्धत राबवून कचरा व्यवस्थापनाची काळजी घेतली जाईल.

प्रत्येक राज्याच्या जनतेने आपल्या देशाला उंचीवर नेण्यासाठी गोव्यात जशी क्रांतीची सुरुवात जाली तशीच क्रांती करायला हवी. जाती-धर्माच्या या घाणेरड्या राजकारणाला (Politics) आपण चिकटून राहिलो तर आपला देश कधीच समृद्ध होणार नाही.

आरजी पक्ष (RG) दक्षिण गोवा समन्वयक आणि कुठ्ठाळी उमेदवार टिओटोनो कोस्टा यांनी सर्व दक्षिण गोव्यातील जनतेला आरजी पक्षाला निवडून गोव्यात (goa) बदल घडवून आणण्यासाठी एक संधी देण्यास प्रोत्साहित केले. आरजी उमेदवारांचा जन्म क्रांतीतून झाला आहे आणि इतर पक्षांच्या उमेदवारांप्रमाणे आम्ही कधीही लोकांचा विश्वासघात करणार नाही असे आश्वासन टिओटोनो यांनी दिले.

डेगली फर्नांडिस (वेली आरजीपी उमेदवार), व्हॅलेरी फर्नांडिस (फातोर्डा आरजीपी उमेदवार), समीर नाईक, सिद्धार्थ नाईक, विकास देसाई, उल्हास केरकर आणि उदय केरकर (मडगाव (Margao) मतदारसंघ गट ) हे उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: हायकोर्टाच्या 'शॉक'नंतर वीज विभागाला जाग, नवीन जोडणीसंदर्भात नियम होणार कठोर

Goa Baby Day Care Centre: नोकरदार पालकांसाठी खुशखबर! गोव्यात ९ ठिकाणी सरकारतर्फे पाळणाघर; केंद्रांची यादी, नियमावली वाचा

U19 Cooch Behar Trophy: द्विशतकी भागीदारीनं गोव्याला सतावलं, ॲरन-सिद्धार्थच्या शानदार खेळीच्या जोरावर हैदराबादनं गाठला मोठा टप्पा

Indian Super League 2024: ०-१ ने पिछाडीवर असलेल्या सामन्यात एफसी गोवाचं जबरदस्त कमबॅक, 'पंजाब'ला 'दे धक्का'

Goa Live Updates: २८ कोटीच्या इफ्फी खर्चाबाबत मुख्यमंत्र्यांनी खुलासा करण्याची गरज; आणि गोव्यातील काही रंजक बातम्या

SCROLL FOR NEXT