Goa DGP  Dainik Gomantak, Canava
गोवा

Goa DGP Jaspal Singh: आसगाव प्रकरणी आरोपानंतर जसपाल सिंग यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, 'पूजा शर्माशी माझा...'

Goa DGP: कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाईचे निर्देश दिले आहेत

गोमन्तक डिजिटल टीम

आसगाव घर मोडतोडप्रकरणी माझ्यावर होत असलेले आरोप निराधार व त्यामध्ये काहीच तथ्य नाही, असे सांगत पोलिस महासंचालक जसपाल सिंग यांनी आपली बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.

अनेक वर्षे मी गोव्यात पोलिस सेवेत काम केले आहे. जो रिपोर्ट उघड झाला आहे, तो स्वाक्षरी नसलेला किंवा निनावी असल्याने संशयास्पद आहे. पोलिस खात्यातील अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत. मी कधीच कोणाला कोणतेही गैरकृत्य करण्यास भाग पाडले नाही.

कायद्याच्या चौकटीत राहूनच कारवाईचे निर्देश दिले आहेत. ड्रग्ससारख्या प्रकरणात धमकी डीजीपी नव्हे, तर इतर कोणीच पोलिस अधिकारी दुसऱ्या पोलिसाला देऊ शकत नाही.

पूजा शर्मा हिच्याशी माझा किंवा माझ्या अधिकाऱ्यांचा संपर्क आलेला नाही. ती कधीही पोलिस मुख्यालयात भेटण्यास आलेली नाही. त्यामुळे जे आरोप झाले, ते निराधार व बेजबाबदारपणाचे आहेत. आसगाव येथील जागा हडप केल्याची तक्रार एप्रिलमध्ये आली होती. त्याची चौकशी सुरू आहे.

हायप्रोफाईलप्रमाणे त्याची दखल न घेता एखाद्या सामान्य तक्रारीनुसार तिचा तपास सुरू आहे. ज्या दस्तावेजाची चर्चा सुरू आहे, तो स्वाक्षरीविना व निनावी आहे. यासंदर्भात पडताळणी व माहिती घेण्यासाठी निलंबित पोलिस निरीक्षकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो झाला नाही, असेही जसपाल सिंग यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Department of Animal Husbandry: पशुसंवर्धन खाते प्रमुखांविना ठप्प, कामधेनू सुधारित योजनेसह अनेक योजना प्रभावित

Goa Today's News Live: बांबोळीत पुन्हा अपघात, दुभाजकाला धडकली बस

Horoscope: आजचा दिवस 'गोल्डन'! गुरुवारी 'या' 3 राशींच्या नशिबाचे दरवाजे उघडणार, परिश्रमाचे उत्तम फळ मिळणार

Night Vigil App: तंत्रज्ञानामुळे रात्रीची सुरक्षा होणार अधिक सक्षम, विद्यार्थ्यांनी बनवलेले 'नाईट व्हिजिल' ॲप पोलिसांसाठी नवे हत्‍यार

Jasprit Bumrah Record: 'शतक' नाही, 'त्रिशतक'! जसप्रीत बुमराह बनणार क्रिकेटचा 'ऑल-फॉरमॅट किंग', फक्त 2 विकेट्सची गरज

SCROLL FOR NEXT