Manish Jadhav
राज्यात गेल्या चार दिवसांपासून आसगाव घर मोडतोड प्रकरण चांगलंच गाजत आहे. या प्रकरणात राज्याचे डीजीपी जसपाल सिंग यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. चला तर मग त्यांच्याविषयी जाणून घेऊया...
गोव्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्याचे पोलीस महासंचालक (डीजीपी) बदलण्यात आले. गृह मंत्रालयाने जसपाल सिंग यांची गोव्याचे नवे डीजीपी म्हणून नियुक्ती केली.
गोव्याचे डीजीपी इंद्रदेव शुक्ला यांची जसपाल सिंग 1 एप्रिल रोजी डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली.
सिंग यांनी विविध पदांवर काम केले आहे. पहिल्यांदा त्यांनी अँटी-नार्कोटिक सेल (ANC) चे सहाय्यक पोलीस अधीक्षक म्हणून, नंतर अतिरिक्त एसपी वाहतूक, त्यानंतर अतिरिक्त एसपी दक्षिण आणि नंतर एसपी दक्षिण म्हणून काम केले.
वरिष्ठ पोलीस अधिकारी म्हणून दिल्लीतील हिसांचार रोखण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका निभावली.
जसपाल सिंग यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. याशिवाय, दिल्ली विद्यापीठातून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. तसेच, त्यांनी मॅनेजमेंट आणि कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्समध्ये पदव्युत्तर पदवी देखील घेतली आहे.