केपे : प्रेयसीबरोबर लग्न होऊ देत नसल्याच्या रागाने दत्तक मुलानेच आपल्या प्रेयसीच्या सहकार्याने आईच्या खून केल्याची घटना उघडकीस आल्याने धडे सावर्डे भागात खळबळ माजली आहे. प्रेयसीबरोबर लग्न होऊ देत नसल्याच्या रागाने दत्तक मुलाने आपल्या आईच्या डोक्यात लोखंडी सळइने वार केले त्यामुळे मनीषा मंगलदास नाईक (वय 54) यांचे निधन झाले असून पोलिसांनी दत्तक मुलगा प्रथमेश आणि त्याच्या अल्पवयीन प्रेयसीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. (the adopted son killed his mother due to marrege essue).
प्राप्त माहितीनुसार मंगलदास नाईक आपली पत्नी मनीषा व दत्तक मुलगा प्रथमेश नाईक यांच्यासह धडे सावर्डे येथे राहत होता. गेल्या काही महिन्यांपासून प्रथमेश एका मुलीच्या प्रेमात पडला पण घरातून लग्नाला विरोध होत होता. त्यामुळे त्यांच्या घरात वाद होत होते. त्यामुळे काही दिवसांपासून प्रथमेश आपल्या मावशीकडे राहत होता.
काल दि.27 रोजी रात्री प्रथमेश व त्याची अल्पवयीन प्रेयसी धडे सावर्डे येथे घरी गेले. तसेच ते घराच्या गच्चीवर जाऊन गुपचूप झोपले होते. आज सकाळी दिं. 28 रोजी मंगलदास सावर्डे येथे आपल्या दुकानावर गेला असता प्रथमेश व त्याची प्रेयसी गच्चीवरून थेट घरात (House) घुसले व रागाच्या भरात लोखंडी सळईने मनीषा हिच्या डोक्यावर वार केले.
या झटापटीत मनीषा हिने ओरडा ओरड केल्याने ती शेजाऱ्यांनी ऐकली व याची माहिती मंगलदास यांना दिली. मंगलदास हे दुपारी घरी आले असता आपली पत्नी दार उघडत नसल्याने लोकांना बोलावले व याची माहिती कुडचडे पोलिसांना माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यावर दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता मनीषा रक्ताच्या थारोळ्यात मृत स्थितीत आढळून आली.
पोलिसांनी प्रथमेश यांच्यावर संशय घेऊन त्यादृष्टीने तपास केला असता अवघ्या काही तासात प्रथमेश व त्याच्या प्रेयसीला ताब्यात घेऊन विचारपूस केली. त्यावेळी त्याने आपण प्रेयसीबरोबर आईचा खून (Murder) केल्याची कबुली दिली.
कुडचडे पोलिस (Police) स्थानकाचे पोलीस निरीक्षक सगुण सावंत यांनी उपअधीक्षक संतोष देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रूग्णालयात पाठवून दिला आहे. कुडचडे पोलीस पुढील तपास करीत आहेत
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.