Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा पर्दाफाश; 23 वर्षीय आरोपीला अटक

आरोपीला वास्को पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई येथून अटक केली असून, गुन्हा केल्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली आहे.

दैनिक गोमन्तक

दाबोळी येथील 14 वर्षीय मुलीच्या अपहरण प्रकरणी वास्को पोलिसांनी महम्मद जाफर कादरी (23) या मूळ उत्तर प्रदेशातील एकाला अटक केली आहे. आरोपीला वास्को पोलिसांच्या पथकाने नवी मुंबई येथून अटक केली असून, गुन्हा केल्यानंतर तो फरार होता. पोलिसांनी आरोपीच्या ताब्यातून पीडितेची सुटका केली आहे.

वास्को पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपील नायक यांनी दिलेल्या माहीतीनुसार, ३० मे रोजी अल्पवयीन मुलगी गायब असून तिचे अपहरण झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानुसार पोलीस संशयिताच्या मागावर होते.पोलिसांना संशयित मुंबईत असल्याची माहिती मिळाली. दाबोळी येथे राहणारा महम्मद जाफर कादरी (मूळ उत्तरप्रदेश) हा तरुण तिला घेऊन नवी मुंबई असल्याचे समोर आले.

त्यानुसार वास्को पोलिसांचे पथक नवी मुंबई येथे पाठवण्यात आले. स्थानिक पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर, हेडकॉन्स्टेबल संतोष भाटकर यांच्या मदतीने वास्को पोलिसांनी महम्मदचा शोध लावून त्याच्या मुसक्या आवळल्या. अल्पवयीन मुलीची सुटका करून तिला गोव्यात आणून कुटूंबाच्या ताब्यात दिले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT