गोव्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच; आज नवे 50 रुग्ण

पुढील 2 महिने कोविड लसीकरणास गती देणार - लसीकरण अधिकारी
COVID CENTER
COVID CENTER Dainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात काल दिनांक 2 मे रोजी कोरोना रुग्णांची संख्या 47 होती. ही संख्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढतानाच दिसत आहे. सद्याची वाढीची गती ही मंद असली तरी हो धोका वाढू शकतो असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. कारण गेल्या आठवड्यात राज्यात केवळ सरासरी 18 रुग्णांची वाढ होत होती. ही संख्या आज 50 वर पोहोचल्याने प्रशासनाच्या ही चिंतेत भर पडली आहे. ( Corona is spreading rapidly in Goa; 50 new patients on June 3 )

अद्याप गोव्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण सापडलेला नाही. मात्र रुग्ण वाढतच आहेत. याबाबत बोलताना आरोग्य संचालक डॉ. गीता काकोडकर यांनी बोलताना कोरोना संदर्भात काळजी घेणे आवश्यक असल्याच ही स्पष्ट केले आहे. त्यासाठी कोविडवर लसीकरण करणे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे गरजेचे असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या

COVID CENTER
लेकीच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन करुन घरी परतणाऱ्या कुटुंबावर काळाचा घाला

गेल्या आठवड्यात गोव्याची कोरोना रुग्णसंख्या केवळ 18 रुग्ण इतकी होती. संक्रमणाचा दर वाढून 3.68 टक्के इतका होता. तर सक्रिय रुग्णांची संख्या पुन्हा शंभराच्यावर जावून 115 झाली होती. यामूळे राज्यातील एकूण संख्या 2 लाख 45 हजार 770 नागरिकांना कोरोनाची बाधा झाली होती. यापैकी 2 लाख 41 हजार 823 रुग्ण बरे झाले. हे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण त्यांना 98.39 टक्के इतके होते.

COVID CENTER
हैदराबादला परतणाऱ्या पर्यटकांवर काळाची झडप; बसचा अपघात नेमका कसा घडला?

या दोन्हीची तुलना करता राज्यात वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या ही वेगाने धोक्याच्या पातळीकडे सरकत असल्याने राज्यशासनाने ही आता सतर्क होत नियमावलीसाठी नागरिकांना सतर्क करावे लागणार आहे. लसीकरण अधिकारी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी याबाबत बोलताना येत्या 5 जून रोजी राज्यात टीका उत्सव. 'हर घर दस्तक'अंतर्गत पुढील 2 महिने कोविड लसीकरणास गती देण्यात येणार आहे. यासाठी प्रतिदिन 2 हजार नागरिकांनी डोस घेणे गरजेचे. पण राज्यातील अनेक नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवत असल्याचं निरिक्षण ही त्यांनी यावेळी नोंदवले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com