Goa Statehood Day 2023 Gomantak Digital Team
गोवा

Goa Statehood Day: गोमंतकासह देशात ‘घटकराज्य दिना’चा उत्साह

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Statehood Day गोवा हे 30 मे 1987 साली भारतीय संघराज्याचे 25 वे राज्य बनले. मंगळवारी राज्याचा ३६वा घटकराज्य दिन गोव्यासह आसाम, बिहार, राजस्थान, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील राजभवनांमध्ये दिमाखात साजरा करण्यात आला.

तेलंगणा राजभवन येथे गोवा घटकराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. गोव्याच्या सांस्कृतिक वैविध्यतेतील एकता आणि गोमंतकीयांच्या स्वातंत्र्यसंघर्षाचे स्मरण करूया, असा शुभेच्छा संदेश तेलंगणाच्या राज्यपाल डॉ. तमिलसाई सुंदरराजन यांनी दिला आहे.

आसामच्या राजभवनातही गोवा घटकराज्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मंगळवारी (ता.30) राजभवन येथे गोवा राज्य स्थापनादिन साजरा करताना आनंद होत आहे.

आसाम आणि गोवा यांच्यातील संबंध मजबूत करणे, दोन्ही राज्यांचा मौल्यवान सांस्कृतिक वारसा आणि त्याचे महत्त्व याची लोकांना जाणीव करून देण्याचा आमचा उद्देश आहे, अशा शुभेच्छा आसामचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया यांनी दिल्या.

बिहार, राजस्थान आणि आंध्र प्रदेश राज्यांतदेखील गोवा घटकराज्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी संबधित राज्यांतील राज्यपालांनी गोव्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या.

‘एक भारत श्रेष्ठ भारत’ उपक्रमाचा भाग म्हणून महाराष्ट्र राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत आज ‘गोवा राज्य स्थापना दिवस’ साजरा करण्यात आला. केंद्र शासनाच्या सूचनेनुसार यंदा प्रथमच महाराष्ट्र राजभवन येथे 'गोवा राज्य स्थापना दिवस साजरा करण्यात आला.

गोव्याने देशाला भारतरत्न लता मंगेशकर, आशा भोसले, डॉ रघुनाथ माशेलकर, गायक रेमो फर्नांडिस, व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांसारखी अनेक रत्ने दिली असून आजही गोवेकर अनेक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देत आहेत, असे सांगून राज्यपालांनी सर्व उपस्थितांना गोवा राज्य स्थापना दिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

यावेळी राज्यपालांच्या हस्ते ज्येष्ठ शास्त्रीय गायक अजित कडकडे, गायिका देवकी पंडित, पार्श्वगायक सुदेश भोसले, समाजसेविका डॉ. आर्मिडा फर्नांडिस, सुमन रमेश तुलसियानी (यांच्या वतीने शरद कुवेलकर), अशांक देसाई, शेफ दीपा सुहास अवचट तसेच ‘आमी गोयंकार’ संस्थेचे अध्यक्ष मोहन संझगिरी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी 'आमी गोयंकर' यांच्या सहकार्याने गोव्यातील नृत्य, संगीत व काव्य यांचा समावेश असलेला सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला.

राजकीय इतिहासातील एक संस्मरणीय दिवस

आपल्या राज्याचे भाग्य घडविण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या असंख्य गोमंतकीयांच्या स्मृतीस आदरांजली अर्पण करूया. त्यांच्या उत्कृष्टतेचा, नावीन्यपूर्णतेचा आणि करुणेचा वारसा पुढे नेत त्यांच्या दूरदृष्टीचा, त्यागाचा आणि चिकाटीचा सन्मान करूया.

- पी.एस. श्रीधरन पिल्लई, राज्यपाल

३० मे हा गोव्याच्या गौरवशाली राजकीय इतिहासातील एक संस्मरणीय दिवस आहे. याच दिनी १९८७ मध्ये गोवा हे भारतीय संघराज्याचे २५वे राज्य बनले होते. हा दिवस गोमंतकीयांनी आपली ओळख जपण्यासाठी केलेल्या संघर्षाचा परिणाम आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

घटकराज्य दिनानिमित्त गोव्यासारख्या सुंदर राज्यातील जनतेला माझ्या शुभेच्छा! गोवा हे नैसर्गिक सौंदर्य, उत्कृष्ट समुद्र किनारे, सुस्वभावी लोक आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीसाठी ओळखले जाते.

- द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती.

गोवा घटकराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! गोवा, शांतता आणि चैतन्य यांचे उत्कृष्ट मिश्रण आहे. आपल्या अद्वितीय संस्कृतीने आणि चिरस्थायी भावनेने प्रेरणा देत आहे. मी गोमंतकीयांच्या कल्याणासाठी आणि समृद्धीसाठी प्रार्थना करतो

- नरेंद्र मोदी, पंतप्रधान.

सर्व गोमंतकीयांना घटकराज्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. गोवा हे मनमिळाऊ लोकांचे राज्य आहे. ३० मे १९८७ या ऐतिहासिक दिवशी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली गोवा हे भारतीय घटकराज्य बनले.

- मल्लिकार्जुन खर्गे, काँग्रेस.

गोव्याच्या जनतेला घटकराज्य दिनानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा. गोवा राज्याने आपल्या चैतन्यशील आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीत रुजून स्थिर प्रगती केली आहे. गोवा हे आदरातिथ्यासाठी खूप प्रसिद्ध आहे.

- अमित शहा, केंद्रीय गृहमंत्री.

गोव्याच्या जनतेला त्यांच्या घटकराज्य दिनानिमित्त विनम्र अभिवादन. गोव्याला नैसर्गिक सौंदर्य आणि समृद्ध सांस्कृतिक वारसा लाभला आहे. अलीकडच्या वर्षात राज्याने उल्लेखनीय प्रगती केली आहे आणि विकासाच्या या मार्गावर राज्य पुढे जावे, अशी माझी इच्छा आहे.

- जे.पी. नड्डा, राष्ट्रीय अध्यक्ष, भाजप

देशाच्या वैभवशाली वारशाची जपणूक करणाऱ्या, देशाच्या समृद्धीसाठी अतुलनीय योगदान देणाऱ्या गोवा राज्याच्या घटकराज्य दिनानिमित्त राज्यातील सर्व जनतेचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतजींच्या नेतृत्वाखाली राज्याने विकास करावा.

- योगी आदित्यनाथ, मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश

नैसर्गिक सौंदर्य, समृद्ध इतिहास आणि वैविध्यपूर्ण संस्कृतीने नटलेल्या महान भारताच्या मौल्यवान भूमीचे एक मौल्यवान रत्न म्हणजे गोवा आहे.

गोव्याची थोरवी गावी तितकी कमीच. समस्त गोमंतकीयांनी ही थोरवी अशीच पुढे अबाधित ठेवावी. गोव्याच्या जनतेला घटकराज्य दिनानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा.

- राहुल गांधी, कॉंग्रेस नेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji News: मळ्यातील तळ्याचे सुशोभिकरण कधी? पणजीतील स्थानिकांचा सवाल

Panaji Smart City: पणजी मनपा इमारतीला 'ग्रीन सिग्नल' कधी? दोनदा पायाभरणी; मात्र कामाला सुरुवात नाही

Chimbel Flyover: Saint Francis Xavier अवशेष प्रदर्शनापूर्वी एक मार्ग होणार खुला ; चिंबल उड्डाणपुलाचे काम पूर्णत्वाकडे

Indian Coast Guards: भारतीय तटरक्षक दलाचा जोरदार सराव! गोवा, महाराष्ट्र किनारपट्टीच्या सुरक्षाव्यवस्थेचे सर्वेक्षण

Hina Khan: तिसऱ्या स्टेजच्या कॅन्सरशी लढणाऱ्या हिनाला गोव्यात वृद्ध महिलेकडून मिळाली प्रेरणा; देवाकडे केली प्रार्थना Video

SCROLL FOR NEXT