video  Dainik Gomantak
गोवा

पाकिस्तानच्या टीमला पाठिंबा देणं 'त्या' मुस्लिम गोवेकराला पडले महागात, गुडघे टेकून म्हणाला 'भारत...Watch Video

'त्या' हॉटेल मालकाला माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

गोमन्तक डिजिटल टीम

गोव्यातील मुस्लिम बांधव पाकिस्तानच्या क्रिकेट टीमला पाठिंबा देत असल्याचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. यात एक पर्यटक व्हिडिओ ब्लॉगिंग (Video Blogging) करताना दिसत असून, हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांना तो तुम्ही कोणत्या टीमला पाठींबा देताय असे विचारतो, त्यावर ते लोक 'पाकिस्तान' असे उत्तर देतात. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर गोमंतकियांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.

दरम्यान या विषयाशी संबंधित एक मोठी update हाती येतेय. ज्याने पाकिस्तान क्रिकेट संघाला पाठिंबा दर्शवला होता, त्या हॉटेल मालकाला कळंगुट परिसरात सार्वजनिकपणे माफी मागायला लावल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. त्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यक्तीला जमिनीवर गुडघे टेकण्यास आणि कान धरण्यास सांगितले जातेय. तसेच देशाप्रती त्यांची निष्ठा सिद्ध करण्यासाठी त्यांना ‘भारत माता की जय’ म्हणायला लावले जात आहे.

YouTube व्हिडिओ 26 नोव्हेंबर 2022 रोजी अपलोड करण्यात आला होता. व्लॉगरने क्लिप ट्विट केली ज्यामध्ये त्या व्यक्तीने 22 फेब्रुवारी 2023 रोजी पाकिस्तानला पाठिंबा व्यक्त केला होता, त्यानंतर तो व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हॉटेल मालकाला त्याच्या कर्मचाऱ्यांसह गुडघे टेकून माफी मागावी लागली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Mega Project: कारापूर-सर्वण मेगा प्रकल्पावर 2 दिवसांत निर्णय, शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक; अधिकाऱ्यांना कागदपत्रे तपासण्याच्या सूचना

Indian Cricketers Ban: भारतीय क्रिकेटमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड! अंडर-19 वर्ल्ड कप स्टार अडकला जाळ्यात; 65 खेळाडूंवर बंदी

Goa Accident: गोव्यात अपघातांची धडकी भरवणारी आकडेवारी! 19 महिन्यांत 1107 जणांचा मृत्यू; दिवसाला दोन जीवांचा बळी

Shukra Gochar 2026: वैभव अन् संपत्तीचा कारक बदलणार चाल! शुक्राचे नक्षत्र गोचर 5 राशींसाठी ठरणार वरदान; धनाचा होणार वर्षाव

Madgaon Urban Bank: मडगाव अर्बनच्या ठेवीदारांना पुन्हा धक्का; पैसे मिळण्याची निश्चित तारीखच नाही! 4.20 कोटींच्या वसुलीसाठी 154 खटले

SCROLL FOR NEXT