Liquor Sale At Aguada Fort Dainik Gomantak
गोवा

Aguada Fort : ऐतिहासिक किल्ल्यावरील ते मद्याचे दुकान अखेर हटविले

पुन्हा येथे मद्याचे दुकान दिसल्यास खबरदार : वेलिंगकर

Rajat Sawant

Aguada Fort : गोवा मुक्तिलढ्याचा साक्षीदार असलेल्या आग्वाद किल्ल्यास ऐतिहासिक महत्व आहे. येथे किल्ल्याला तसेच तेथील संग्रहालयास मोठ्या संख्येने पर्यटकही भेट देत असतात. आग्वाद किल्ल्यात मद्याचे दुकान थाटल्याचे काही दिवसांपूर्वी उघडकीस आले होते.

या घटनेमुळे राज्यातून संताप व्यक्‍त केला जात होता. यामुळे स्वातंत्र्यसैनिकांचा अपमान झाल्याची संतापाची भावना सर्वस्तरातून व्यक्‍त केली जात होती. तसेच मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणी ‘आपण त्‍यात लक्ष घालणार आहे' अशी प्रतिक्रिया दिली होती.

अखेर मंगळवारी संध्याकाळी ते मद्याचे दुकान हटवण्यात आले. यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना मंगळवारी पत्रकारांनी याप्रकरणी विचारले असता ‘आपण त्‍यात लक्ष घालणार आहे’ अशी त्रोटक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.

मद्याचे दुकान हटवण्यात आले हा लोकजागृतीचा विजय आहे. हे मद्याचे दुकान बंद करून टेबलेही हटविण्यात आली आहेत. पुन्हा येथे मद्याचे दुकान दिसल्यास खबरदार, असा इशारा गोवा सुरक्षा मंचचे प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT