Crime In Konkan Railway  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात धावत्या ट्रेनमध्ये मुलीचा विनयभंग; ठाण्यातील 'त्या' युवकाला 14 दिवसांची पोलीस कोठडी

पणजी येथील बालन्यायालयात ही सुनावणी पार पडली.

गोमन्तक डिजिटल टीम

पेडणे, गोवा येथे धावत्या ट्रेनमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी युवकाला अटक करण्यात आली. ठाणे, महाराष्ट्रातील या संशयित आरोपीला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पणजी येथील बालन्यायालयात ही सुनावणी पार पडली.

रोहन शेट्टी (वय 34, रा. ठाणे, महाराष्ट्र) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

मुंबईहून कोचूवेली येथे जाणाऱ्या ट्रेनमध्ये संशयिताचे कुटुंबीय आणि त्या मुलीचे कुटुंबीय प्रवास करीत होते. 25 जुलै रोजी पहाटे 3 च्या सुमारास संशयित मुलाने मुलीला स्पर्श केला. झालेल्या या प्रकाराबाबत मुलीने आईला सांगितले.

ट्रेन मडगाव रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर त्या मुलीच्या आईने पोलिसात झालेल्या प्रकाराबद्दल तक्रार दिली. तक्रारीची दखल घेत कोकण रेल्वे पोलिसांनी संशयिताला अटक केली. कोकण रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ganesh Idol: विसर्जनानंतर किनाऱ्यांवर 'गणेशमूर्तीं'ची होणारी विटंबना, यंदा तरी कठोर कारवाई होणार का?

Zodiac Personality Traits: खिशाला कात्री लावणे यांच्या रक्तातच नाही! 'या' 3 ग्रहांचे राजे पैशांच्या बाबतीत का असतात एवढे कडक?

Social Media Post Controversy: अभिषेक शर्माची दिल्ली उच्च न्यायालयात धाव; सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट आणि फोटोंबाबत कोर्ट देणार अंतरिम आदेश

Sattari Heavy Rain: सत्तरीत वीजवाहिन्यांची मोठी हानी; वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड सुरूच

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

SCROLL FOR NEXT