Thalassa Goa News Dainik Gomantak
गोवा

Thalassa Goa: इटालियन थालासा वादाच्या भोवऱ्यात; मोठ्या आवाजात संगीत वाजावल्याने व्यवस्थापकावर कारवाई

Noise Pollution Goa: गोव्यातील प्रसिद्ध थालासा क्लिफ हॉटेल एका कार्यक्रमादरम्यान मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यामुळे वादात सापडले आहे.

Akshata Chhatre

हणजूण: गोव्यातील प्रसिद्ध थालासा क्लिफ हॉटेल एका कार्यक्रमादरम्यान मोठ्या आवाजात संगीत वाजवल्यामुळे वादात सापडले आहे. थालासा क्लिफ हॉटेलने नुकत्याच एका कार्यक्रमात आवाजाची पातळी ओलांडून संगीत वाजवल्याने स्थानिकांना त्रास सहन करावा लागला. स्थानिकांनी याबद्दल पोलीस तक्रार नोंदवली असून हणजूण पोलिसांनी तपास सुरु केला आणि तपासाच्या शेवटी हॉटेलने ध्वनी नियमांचे उल्लंघन केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आणि परिणामी गुन्हा नोंद झाल्याने हॉटेलच्या समस्या वाढल्या आहेत.

पर्यावरण संरक्षण कायदा, १९८६ च्या कलम १५ च्या अंतर्गत व्यावसायिकाला आता दंडाची रक्कम भरणं भाग असणार आहे. हा पर्यावरण कायदा ध्वनी प्रदूषण नियमांवर लक्ष केंद्रित करून पर्यावरण संरक्षण नियमांचे उल्लंघन करण्यावर आळा बसवतो.

ध्वनी प्रदूषण नियंत्रण नियमाच्या कलम ५ अंतर्गत देखील व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा नियम ध्वनी प्रदूषण नियंत्रित करण्यावर भर देतो.

या घटनेमुळे हॉटेल आणि इतर आस्थापनांना देखील गोव्यातील ध्वनी नियमांबद्दल माहिती मिळाली आहे. सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करताना ध्वनी प्रदूषण नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेली त्वरित कारवाई ही देखील उल्लेखनीय आहे मात्र आता या घटनेचा परिणाम गोव्यातील पर्यटन क्षेत्रातील ध्वनी नियंत्रणावर कसा होतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

इन्शाअल्लाह, मी संपूर्ण चेकपोस्ट उडवून देईन… दहशतवादी उझैदची व्हॉट्सॲप चॅट व्हायरल; '005 ब्रिगेड' ग्रुपमध्ये रचला मोठा कट

आयएसआयसोबत बैठक अन् 22 दहशतवाद्यांची यादी! ऑपरेशन सिंदूरनंतर आता नवा खुलासा; POK मधील तळांबाबत जैश कमांडरची जाहीर कबुली

Keralam School Shooting: मित्रांना बंदूक दाखवण्याचा नाद बेतला जीवावर! अचानक सुटलेल्या गोळीत नववीतील विद्यार्थी जखमी; केरळमधील थरकाप उडवणारा प्रकार

'16 डिसेंबरपर्यंत भारत बांगलादेश ताब्यात घेईल'; पश्चिम बंगालच्या मंत्र्यांचा मोठा दावा, हिंदूंच्या हत्यांचा बदला घेण्याचा इशारा

T20 Cricket: हातातला विजय गोव्याने गमावला! अखेरच्या षटकात फेलिक्सची गोलंदाजी महागात, छत्तीसगडचा विजय

SCROLL FOR NEXT