Goa Tourism  Dainik Gomantak
गोवा

Goa Tourism: गोव्यापेक्षा थायलंडला पसंती! टॅक्सी माफिया, महागडे हॉटेल्सचा पर्यटनाला फटका?

Goa Tourism: गोव्यात ओला, उबेरची सुविधा हवी होती, असे म्हटले आहे.

Pramod Yadav

पणजी: गोव्यात येणाऱ्या परदेशी पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याची एक धक्कादायक आकडेवारी सोशल मिडियावरुन शेअर केली जात आहे. कोरोना महामारीनंतर गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या रोडावली असल्याचे या आकडेवारीत म्हटले आहे. सीईआयसीच्या आकडेवारीवरुन याबाबत दावा केला जात आहे. या अहवालावर प्रतिक्रिया देताना नेटकऱ्यांनी गोव्यातील टॅक्सी माफिया आणि महागड्या हॉटेल्सना दोषी धरले आहे.

रामानुज मूखर्जी या व्यक्तीने याप्रकरणी एक्सवर एक पोस्ट लिहली आहे. या पोस्टमध्ये त्याने २०१४ ते २०२३ या काळात गोव्याला भेट दिलेल्या पर्यटकांची संख्या दिली आहे. या २०१४ मध्ये साठ लाख विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली तर २०२३ मध्ये केवळ पंधरा लाख परदेशी पर्यटक गोव्यात आले. यावरुन गोव्यात येणाऱ्या विदेशी पर्यटकांची संख्या कमी झाल्याचा दावा मूखर्जींनी केला आहे.

China Economic Information Centre (CEIC) या अहवालात कोरोनापूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये ८० लाखांहून अधिक विदेशी पर्यटकांनी गोव्याला भेट दिली मात्र कोरोनानंतर यात घट झाल्याचा दावा अहवालात केला आहे.

रामानुज यांनी शेअर केलेल्या माहितीवर अनेकांनी प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. त्यांच्या एक्सवरील पोस्टला दोन लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाल्या आहेत. अनेकांनी या पोस्ट मत व्यक्त करताना गोव्यातील पर्यटन अनुभवाबाबत नकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी गोव्यातील महागड्या हॉटेल्सचा अनुभव शेअर केला आहे. तर, काहींनी राज्यात टॅक्सी माफियांची दादागिरी होत असल्याची टीका केली.

आणखी एका व्यक्तीने गोव्यात टॅक्सी माफियांची दहशत असल्याचा दावा केला. गोव्यातील टॅक्सी खूपच महागड्या असल्याचे या व्यक्तीने म्हणत, राज्यात ओला, उबेरची सुविधा हवी होती, असे म्हटले आहे.

दरम्यान, अखिल गोएल नावाच्या एका व्यक्तीने रामानुज यांनी शेअर केलेली आकडेवारी खोटी असल्याचे एका पोस्टमधून म्हटले आहे. अखिल यांनी पर्यटन विभागाची आकडेवारी शेअर केलीय.

अखिल यांनी शेअर केलेल्या आकडेवारीनुसार गोव्यात २०१४ साली ५.१४ लाख विदेशी पर्यटक आले होते तर, २०२३ साली ४.०३ पर्यटक आले होते. त्याचवेळी २०१४ साली ३५.४५ लाख देशी पर्यटक तर २०२३ साली ७० लाख पर्यटक गोव्यात आल्याचा दावा अखिल यांनी पोस्टमधून केला आहे.

दोन्ही आकडेवारीतील तथ्य समोर आलेले नाही. दरम्यान, दोन्ही पोस्टमधून शेअर केलेली आकडेवारी खरी असल्याचा दावा केला आहे. अनेकांनी गोव्यातील पर्यटन आणि निसर्गसौैंदर्य उत्तम असल्याचे म्हटले आहे.

पण, राज्यातील वाहतूक व्यवस्था, टॅक्सी सेवा व्यवस्थित नसल्याचे म्हटले आहे. तसेच, राज्यातील हॉटेल्स देखील महागडे असल्याचे म्हटले आहे. गोव्यापेक्षा थायलंड आणि श्रीलंका स्वस्त असल्याचे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Indian Navy Goa: गोव्यात नौदलाच्या जहाजाचा अपघात; मच्छिमारांच्या बोटीला धडक, दोन बेपत्ता, 11 जाणांना वाचविण्यात यश

Saint Francis Xavier Exposition: जुन्या गोवेत देशी-विदेशी भाविकांची गर्दी! कार्डिनल फिलिप नेरी फेर्रांव यांनी प्रार्थना घेऊन केला शुभारंभ

Electricity Tariff Hike: वीज दरवाढीच्या शिफारशींना ‘जीसीसीआय’चा आक्षेप; पर्यटन व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होण्याची शंका

Panaji: मांडवी पुलावर पेटत्या कारचा थरार! आगीच्या भडक्यात दर्शनी भाग जळून खाक; शॉर्टसर्किट झाल्याचा संशय

Goa Recruitment: तरुणांसाठी खुशखबर! निवड आयोगामार्फत 285 रिक्त जागांसाठी जाहिरात; 'या' पदांसाठी मागवले अर्ज

SCROLL FOR NEXT