tetraods sea.jpg 
गोवा

केरी समुद्रकिनाऱ्यावरील टेट्रापॉडची संरक्षक भिंत कोसळण्याच्या मार्गावर

दैनिक गोमंतक

म्हापुसा :  केरी समुद्र किनाऱ्यावरील 1600 मीटर गॅबियन संरक्षण भिंत  बांधल्यानंतर तीन वर्षांनी समुद्री संरक्षणाच्या सर्वोत्तम उपायांपैकी एक मानली जाणारी टेट्रापॉडची झीज होत असल्याने भिंत कोसळण्याचा धोका दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसत आहे. 2008 साली 4.2 कोटी रुपये खर्च करून केरी समुद्रकिनारी 1600  मीटर गॅबियन संरक्षण भिंत बांधण्यात आली होती.  समुद्र किनाऱ्यावरील जमिनीची झीज कमी करण्यासाठी  दीर्घकालीन उपाय योजना म्हणून टेट्रापॉड्स ठोस रचना करण्यात आली आहे. (The tetrapod wall on Kerry beach is on the verge of collapsing due to increased erosion) 

दरम्यान, समुद्र किनाऱ्यावर संरक्षण भिंत तयार करण्यासाठी टेट्रापॉड बसविण्याचे काम 2012  मध्ये सुरू झाले होते आणि सुमारे चार वर्षांपूर्वी म्हणजे 2017 मध्ये ते पूर्ण झाले. मात्र भिंतीचा पाया पाण्याखाली येत असल्याने भिंतीच्या बाजूला असणारे टेट्रापॉड्स अस्थिर होत आहेत.  त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर जाणाऱ्यांसाठी हे  धोकादायक बनले आहे.  गोव्याच्या सुवर्ण महोत्सवी पॅकेजअंतर्गत टेट्रापॉडच्या भिंत दुरुस्तीसाठी आणि केरी, अंजुना, कॅन्डोलिम, उटोर्डा, मजोर्डा, बेतालबाटीम, तळपोना आणि पोलेम येथे समुद्रकिनार्‍याच्या जीर्णोद्धारासाठी केंद्र सरकारने 85 कोटी रुपये मंजूर केले होते.

केरी समुद्र किनाऱ्यावरील 650 मीटरच्या भागात  प्रत्येकी एक टनचे 1200 टेट्रापॉड आणि 2000  ब्लॉक तुटलेल्या अवस्थेत आहेत.  यामुळे समुद्रकिनार्‍याचा हा प्रभावित भाग नदी-समुद्राच्या संगमावर आहे.  अशातच  पावसाळ्यात जोरदार प्रवाहाचा देखील याच्यावर प्रभाव पडत आहे. तर किनारपट्टीवरील  कॅसुरीनाची झाडे भरपूर प्रमाणात होती, परंतु गेल्या काही वर्षात उपटून टाकण्यात आली आहे..

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Waste Management: कचरा व्यवस्थापनाचे नियम पाळा, अन्यथा कारवाईची शक्यता; 385 घटकांवर प्रशासनाची नजर

Morjim School Repair: महिना उलटूनही शाळेची दुरुस्ती रखडली; अंगणवाडी स्टेजवर, बालहक्क आयोगाची नाराजी

Morjim Beach Safety: मोरजी बीचवर गुरांचे कळप, भटक्या श्वानांचा उपद्रव; पर्यटन हंगामात पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न!

Ranji Trophy: गोव्याची फलंदाजी ठरतेय डोकेदुखी; विदर्भाविरुद्ध पराभवांची मालिका खंडित करण्याचे आव्हान

Rohit Sharma Dance Video: 'ले गई, ले गई' गाण्यावर रोहित शर्मानं धरला ठेका! करिश्मा कपूरसोबतचा डान्स व्हिडीओ व्हायरल; हिटमॅन म्हणाला, 'मजा आ गया'

SCROLL FOR NEXT