St. Francis Xavier  
गोवा

St. Francis Xavier च्या अवशेषांची DNA चाचणी करा; हिंदू रक्षा महाआघाडीची मागणी

गोंयचो सायब अशी ओळख असललेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष प्रदर्शनास येत्या नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे.

Pramod Yadav

डिचोली: ओल्ड गोव्यातील सेंट फ्रान्सिस झेवियरच्या अवशेषांची डिएनए चाचणी करावी, अशी मागणी हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने करण्यात आली आहे. गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्यांना महाआघाडीच्या वतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.

गोवा मुक्तीसाठी बलिदान दिलेल्या शहिदांना हिंदू रक्षा महाआघाडीच्या वतीने आंदरांजली अर्पण करण्यात आली. डिचोलीत महाआघाडीने कार्यक्रम आयोजित करत शहिदांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. यावेळी हिंदू रक्षा महाआघाडीचे सुभाष वेलिंगकर उपस्थित होते.

ओल्ड गोव्यातील बॅसिलिका बॉम जिझस चर्चमध्ये असणाऱ्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांच्या अवशेषांची DNA चाचणी करावी, अशी मागणी वेलिंगकर यांनी केली.

गोंयचो सायब अशी ओळख असललेल्या सेंट फ्रान्सिस झेवियर यांचे अवशेष प्रदर्शनास येत्या नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. यापूर्वी वेलिंगकर यांच्या मागणीने विविध चर्चांना उधाण आले आहे.

सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवशेष दर्शन सोहळा (St. Francis Xavier Exposition Date, Place)

गोव्यात २१ नोव्हेंबर २०२४ ते ४ जानेवारी २०२५ या कालावधीत ओल्ड गोव्यात सेंट फ्रान्सिस झेवियर यांचा अवशेष दर्शन सोहळा पार पडणार आहे. दहा वर्षातून एकदा भरणाऱ्या या सोहळ्यासाठी जगभरातील पर्यटक हजेरी लावतील. ख्रिस्ती बांधवांसाठी अतिशय खास मानला जातो.

गोवा सरकार या सोहळ्यासाठी जय्यत तयारी करत असून, ४५ दिवसांच्या या सोहळ्यासाठी ४०० कोटी रुपयांपर्यंत खर्च अपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्सी फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT