Pune To Goa: घाट, बीच आणि नयनरम्य निसर्ग; पुण्यातून गोव्याला जाणारे सात मार्ग तुम्हाला माहितीयेत का?

Pune To Goa Route: पुणे ते गोवा जवळपास साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचे अंतर आहे. तुम्ही कोणत्या मार्गे गोव्याला जाणे पसंत करता यावर अंतर आणि वेळ अवलंबून आहे.
Pune To Goa: घाट, बीच आणि नयनरम्य निसर्ग; पुण्यातून गोव्याला जाणारे सात मार्ग तुम्हाला माहितीयेत का?
Anuskura GhatJoe X Handle
Published on
Updated on

Pune To Goa Route

भूरळ घालणारे समुद्रकिनारे, नयनरम्य निसर्ग, समृद्घ ऐतिहासिक वारसा आणि स्वस्त मिळणारी बिअर या सर्व गोष्टी देशी आणि विदेशी पर्यटकांना खुणावत असतात. गोव्याला जाण्याचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.

विमानाने, रेल्वे ते रस्त्याने प्रवास करुन गोव्याला जाता येते. पुणे, मुंबईतून गोव्याला जाण्यासाठी विविध मार्गाचे पर्याय आहेत. पुण्यातून गोव्याला जाणाऱ्या विविध मार्गाची माहिती आपण घेणार आहोत.

पुण्यातून गोव्याला जाणारे वेगवेगळे सात मार्ग

1. पुणे- नीपाणी - आंबोली- सावंतवाडी- गोवा

2. पुणे- कोल्हापूर- गारगोटी- आंबोली- सावंतवाडी-गोवा

3. पुणे- कोल्हापूर- राधा नगरी - फोंडा घाट- कणकवली- गोवा

4. पुणे- बेळगाव- चोर्ला घाट-गोवा

5. पुणे- बेळगाव - अनमोड घाट- गोवा

6. पुणे - कराड- आणुस्करा घाट- राजापूर- गोवा

7. पुणे - अलिबाग- मुरुड- दिघी- दिवे अगर- बाग मांडले- वेसवी - केळशी- पाळांदे - लाडघर - गुहागर- देवगड - आरोंदा- गोवा

Pune To Goa: घाट, बीच आणि नयनरम्य निसर्ग; पुण्यातून गोव्याला जाणारे सात मार्ग तुम्हाला माहितीयेत का?
Galgibagh Beach: जीवन संपविण्यासाठी त्याने नदीत उडी घेतली, जीवरक्षकांनी वाचवले प्राण

वेळ, अंतर आणि खर्च किती येईल?

पुणे ते गोवा जवळपास साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचे अंतर आहे. तुम्ही कोणत्या मार्गे गोव्याला जाणे पसंत करता यावर अंतर आणि वेळ अवलंबून आहे. याशिवाय बाईक की कार प्रवास यावर देखील वेळ आणि अंतराचे गणीत ठरणार आहे. बाईकने गेल्यास साधारण हजार रुपयांचे पेट्रोल लागू शकते, तर चारचाकीने गेल्यास वाहनानुसार तेलासाठी तीन ते चार हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

विमान आणि रेल्वे प्रवासाचे आणखी दोन पर्याय

पुण्यातून गोव्याला जाण्याचा आणखी दोन पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे विमान आणि रेल्वेने देखील प्रवास करता येईल. विमानाने गोव्याला जाण्यासाठी तीन हजार रुपयांपासून ते सहा हजार रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो. तर, रेल्वेने गोव्याला जाण्यासाठी जवळपास चारशे रुपये खर्च अपेक्षित आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com