Tense situation at Mormugao, Goa, after two groups clash on the occasion of Holi Dainik Gomantak
गोवा

मारहाणप्रकरणी 47 जणांविरोधात गुन्हे दाखल, प्रमोद सावंत म्हणाले...

मुरगावात कालपासून वातावरण बरेच तापलेले आहे

दैनिक गोमन्तक

लोकांना मारहाण करणे, घरावर दगडफेक करून नुकशान करणे अशा प्रकारची असभ्य प्रवृती गोव्यात मुळीच खपवून घेतली जाणार नाही. मुरगावात काँग्रेस समर्थकांनी विनाकारण आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली असून असली घाणेरडी वृत्ती कदापी खपवून घेणार नाही. या प्रकरणात कडक कारवाई करण्याचे आदेश मी पोलीस महासंचालकांना दिल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांनी सांगितले.

मुरगाव मतदारसंघातील काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी रंगपंचमीच्या दिवशी नगरसेवक प्रजय मयेकर यांचे वडील प्रदीप मयेकर, भाजप युवा अध्यक्ष योगेश बांदेकर यांना मारहाण केल्याने आणि मयेकर यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केल्याने मुरगावात कालपासून वातावरण बरेच तापलेले आहे.

बोगदा आणि इतर भागात कायदा सुव्यवस्था हाताबाहेर जाऊ नये यासाठी काल शुक्रवारी व आज मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला होता. या प्रकरणात मुरगाव पोलिसांनी 47 जणांविरुद्ध दंगल, मारामारी, ट्रेसपास (अतिक्रमण) इत्यादी गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत 9 जणांना अटक केल्याची माहिती गोवा पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी दिली. इतर गुन्हेगारांनी पोलीसांना शरण यावे असे आवाहनही त्यांनी केले.शुक्रवारी रंगपंचमीच्या दिवशी नगरसेवक आणि भाजप नेता प्रजय मयेकर यांचे वडील प्रदीप मयेकर दुचाकीने जात असता बोगदा परिसरात रंगपंचमीचा साजरी करत असलेल्या काही काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना अडवून त्यांच्याशी वाद घालण्यास सुरवात केली. दुचाकीचे नुकसान करून त्यांना मारहाण केली.

त्यानंतर प्रदीप घरी पोचले असता त्या काँग्रेस कार्यकत्यांनी तेथे जाऊन पुन्हा त्यांची, त्यांच्या पत्नीला आणि भावाला मारहाण केली. तसेच त्यांच्या घरावर दगडफेक करून नुकसान केल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. या प्रकरणात दुसऱ्या बाजूने एका व्यक्तीने मारलेला दगड एका कॉग्रेस समर्थकाच्या डोक्यावर बसल्याने तो जखमी झाला अशी माहिती पोलीस सूत्रांकडून प्राप्त झाली. मारहाणीत प्रदीप मयेकर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी चिखली उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. तसेच भाजप (BJP) युवा अध्यक्ष योगेशबांदेकर यांना काही कांग्रेस कार्यकर्त्यांनी शुक्रवारी मारहाण केल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे मुरगावातील बोगदा आणि इतर परिसरात शुक्रवारी संध्याकाळपासून वातावरण बरेच तापले असून कायदासुव्यवस्था आणखीन हाताबाहेर जाऊ नये यासाठी सध्या मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, दुपारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, माजी आमदार मिलींद नाईक यांनी चिखली उपजिल्हा इस्पितळात येऊन जखमी प्रदीप मयेकर यांची विचारपूस केली व सविस्तर माहिती जाणून घेतली.यावेळी मुख्यमंत्री सावंत यांच्यासमवेत पोलिस महासंचालक आय डी शुक्ला उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी तृणमूल काँग्रेस निवडून आले नाही त्यांचा फ्लेवर मात्र राहिला तो फ्लेवर व तीच प्रवृत्ती काँग्रेस चालवतो. एखादा जिंकल्यानंतर दुसऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण करणे ही संस्कृती काँग्रेसची (Congress) आहे हे त्यांनी दाखवून दिले आहे. असली संस्कृती गोव्यात नव्हती. असली असभ्य संस्कृती कोणी केले आहे अशा सगळ्यांना अटक करण्याचे फर्मान मी पोलीस महासंचालकाना सोडले आहे. अशाप्रकारची दृष्ट वृत्ती गोव्यात खपवून घेतली जाणार नाही.असल्या प्रवृत्तीच्या कोणलाच थारा दिला जाणार नाही असे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

यावेळी पोलिस (police) महासंचालक शुक्ला यांनी बोलताना मुरगावात (mormugao) बन्याच प्रमाणात बेकायदेशीर जुगार अड्डे, क्लब, मटक्यांचे अड्डे असून गुंडगिरीचे हे एक कारण असल्याचे दिसून येते. आजपासून मुरगाव तालुक्यातील सर्व पोलीस स्थानकांच्या अधिकाऱ्यांना जुगार अड्डे क्लब शंभर टक्के बंद करण्याचे आदेश दिलेले आहेत. याची अंमलबजावणी न झाल्यास पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याचे संकेत शुक्ला यांनी दिले.मुरगावात गुंडगिरीचे प्रकार पुन्हा वाढत असल्याचे दिसून येत असून बालन नावाच्या व्यक्तींच्या गुंडगिरीला मुळीच थारा देणार नसल्याचे सांगून, केलेल्या मारहाणीच्या या प्रकरणात पोलिसांनी गंभीर दखल घेत 47 जणांविरुद्ध विविध गुन्हे नोंद केले असून 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे. गरज पडल्यास ही गुंडगिरी मोडून काढण्यासाठी रासुका लावू असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Sabarmati Report: गोध्रा अग्निकांडावर बेतलेला 'द साबरमती रिपोर्ट' गोव्यात टॅक्स फ्री; मुख्यमंत्र्यांची घोषणा

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Cash For Job Scam: गोमंतकीयांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या विषया आणि सोनियाला जामीन मंजूर; मडगाव कोर्टाचा निर्णय

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

SCROLL FOR NEXT