सासष्टीत रुग्‍णांची हेळसांड, नावेलीत ही गैरसोय

सरकारने गंभीर दखल घेऊन रुग्‍णांना दिलासा द्यावा, नागरिकांची मागणी
Disadvantages of kidney patients in the Salcete, Navelim is inconvenient
Disadvantages of kidney patients in the Salcete, Navelim is inconvenientDainik gomantak
Published on
Updated on

सासष्टी : वेपॉक्स लस नागरी आरोग्यकेंद्र किंवा दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्याची मागणी डायलिसिसिवर असलेल्‍या मूत्रपिंड (Kidney) रुग्‍णांनी केली आहे. ज्या रुग्णांनी ही मागणी केली आहे, ते सध्‍या नावेली आरोग्यकेंद्रामध्ये यावर उपचार घेत आहेत.

यापूर्वी ही लस नागरी आरोग्यकेंद्रात उपलब्ध होती. पण गेल्या चार-पाच महिन्यांपासून ती मिळत नाही. त्यामुळे रुग्णांना दर दहा दिवसांनी बांबोळी येथील गोवा (goa) वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात जावे लागते.

Disadvantages of kidney patients in the Salcete, Navelim is inconvenient
पेडणेवासीयांचा वाढतोय ‘पारा’ वीज खात्‍याला इशारा

नावेली (Navelim) आरोग्यकेंद्रात जे रुग्ण उपचार घेत आहेत, ते सामान्य नागरिक असून त्यांना दर दहा दिवसांनी बांबोळीला जाणे परवडत नाही. अस मत रुग्णांनी व्यक्त केले आहे. लॉरेल आब्रांचीस या रुग्णाने (Patient) सांगितले की, वेपॉक्स लस उपलब्‍ध नाहीच, पण आता हिमोग्‍लोबिन (Hemoglobin) वाढवण्यासाठी आणखी एक लस असते, ती पण सध्‍या उपलब्ध नाही.

दुसरी गोष्‍ट म्‍हणजे नावेली आणि परिसरात वीजपुरवठा अनियमित असतो. बत्ती केव्‍हा गुल होईल याचा पत्ता नसतो. त्यामुळे रुग्ण भयभीत होतात. नावेली आरोग्‍यकेंद्रात (Health Center) जेनरेटर आहे, पण तो सुरू व्हायला वेळ लागतो. जे डायलिसिस रुग्ण आहेत, त्यांची रक्ततपासणी प्रक्रियाही असते. जर ही व्यवस्था येथेच उपलब्‍ध केली तर त्यांचे सुमारे दीड हजार रुपये वाचतील, असेही आब्रांचीस यांनी सांगितले. सरकारने (Government) याची गंभीर दखल घेऊन रुग्‍णांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Assembly Election Results 2026
Goa teacher sentenced 11 years
Goa Cashew Season 2026
morajit road traffic problem today
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com