chola film poster 
गोवा

IFFI Goa: 'चोला' चित्रपटाला करणी सेनेचा विरोध; भगवे कपडे, तुळस- रुद्राक्षाच्या सीनवर आक्षेप, यॉटवर ज्येष्ठ अभिनेत्यासमोर राडा

Chola Trailer Launch Event At Iffi Goa: चोला चित्रपट एका प्रोफेसरच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट आहे.

Pramod Yadav

Chola Trailer Launch Event At Iffi Goa

पणजी: गोव्यात सुरु असलेल्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात चोला चित्रपटातील काही सीन्सवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत राडा घातला. इंडियन मोशन पिक्चर प्रोड्युसर असोसिएशन Indian Motion Picture Producers' Association (IMPPA) च्या वतीने पणजीत एका यॉटवर चोला चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च करण्यात आला, यावेळी करणी सेना आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. चित्रपटाचे दिग्दर्शक अतुल गर्ग आणि अभिनेते मनोज जोशी यावेळी उपस्थित होते.

२० नोव्हेंबरपासून गोव्यात ५५ व्या इफ्फीला सुरुवात झाली आहे. महोत्सवाच्या एका कार्यक्रमात आगामी चोला चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च सोहळा पार पडला. चोला चित्रपट एका प्रोफेसरच्या आयुष्यावर बेतलेला चित्रपट आहे.

दरम्यान, या चित्रपटात प्रोफेसरची भूमिका करणाऱ्या अभिनेत्याने भगवे वस्त्र, तुळस आणि रुद्राक्षाच्या माळ्या जाळल्याची काही दृष्य आहेत. या दृष्यांवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला. ही दृष्य चित्रपटातून हटवली जात नाहीत, तोवर तो प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतली.

प्रोफेसर मन:शांतीसाठी भगवे वस्त्र आणि तुळस व रुद्राक्षाच्या माळा परिधान करून आश्रमात जातो. पण, त्याला मन:शांती मिळत नाही. एक बाबा त्याला मन:शांतीसाठी अंर्तआत्माचा शोध घ्यायला सांगतात. यावरुन चित्रपटाचा नायक भगवे वस्त्र, तुळस व रुद्राक्षाच्या माळांचे दहन करुन पुन्हा प्रोफेसर म्हणून काम करु लागतो, असे चित्रपटात दाखवण्यात आले आहे. याच दृष्यांवर करणी सेनेच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेतला.

चित्रपट लांबच आम्ही ट्रेलर देखील लॉन्च होऊ देणार नाही, अशी भूमिका करणी सेनेने घेतली आहे.

करणी सेनेने आक्षेप घेतल्यानंतर त्यांना पुन्हा चित्रपटाचा ट्रेलर दाखवण्यात आला. पण, सेनेच्या सदस्यांनी आक्षेप घेतलेले सीन हटवले जात नाहीत तोवर चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. करणी सेना आक्रमक झाल्यानंतर अभिनेता मनोज जोशी कार्यक्रमातून निघून गेले. त्यांच्यापाठोपाठ इतर मान्यवर देखील कार्यक्रमातून बाहेर पडले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sand Extraction: वाळू व्यवसायाच्या वादातून गोळीबार, पेडणे पोलिसांची मोठी कारवाई; 5 संशयितांना ठोकल्या बेड्या

Goa Politics: खरी कुजबुज; ‘गोंय विकले घाटार’

Mhaje Ghar: 'फोंड्याला पोरका समजू नका'! CM सावंतांचे भावनिक आवाहन; घरे कायदेशीर करून देणार असल्याची दिली ग्वाही

Bondla Sanctuary: प्रतिक्षा संपली! बोंडलामध्ये दिसणार 'अस्‍वल' आणि 'हरीण'; छत्तीसगड, महाराष्‍ट्रातून होणार आगमन

Goa Crime: पोलीस असल्याचे भासवून पर्वरी महामार्गावर अडवली गाडी, 8 लाख लुटले; इराणी गँगमधील संशयिताला पुण्यातून अटक

SCROLL FOR NEXT