Jail Arrest Dainik Gomantak
गोवा

Forced Conversion: हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

Goa Women Arrested: आग्रा येथे दोन बहिणी (वय वर्षे ३३ आणि १८) बेपत्ता झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासात धर्मांतर प्रकरणातील ‘रॅकेट’ उघडकीस आले.

Sameer Panditrao

लखनौ: सक्तीच्या धर्मांतर प्रकरणात देशातील विविध सहा राज्यांतून १० जणांना अटक करण्यात आल्याची माहिती उत्तर प्रदेश पोलिसांनी आज (ता. १९) दिली. यात गोव्यातील एका महिलेचाही समावेश असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.

आग्रा येथे दोन बहिणी (वय वर्षे ३३ आणि १८) बेपत्ता झाल्यानंतर सुरू असलेल्या तपासात धर्मांतर प्रकरणातील ‘रॅकेट’ उघडकीस आले. संबंधित बहिणींना जबरदस्तीने धर्मांतर करण्यास भाग पाडण्यात आले.

बहिणींपैकी एकीने तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवर एके-४७ रायफल हातात धरलेल्या मुलीचा फोटो ठेवला होता. या बहिणींना ‘लव्ह जिहाद’ प्रकरणात गुंतलेल्या एका टोळीने लक्ष्य केले होते, असे आग्रा पोलिस आयुक्त दीपक कुमार यांनी सांगितले.

ही टोळी आयसीस पद्धतीने धर्मांतर करत असल्याचे दिसून आले आहे. अटक केलेल्या १० जणांमध्ये गोव्यातील आयशा ऊर्फ एस. बी. कृष्णा या महिलेचा समावेश आहे. तसेच कोलकाता येथील अब्बू तालिब खलापर, डेहराडूनमधील अबू रेहमान, दिल्लीतील मुस्तफा उर्फ मनोज, जयपूरमधील मोहम्मद अली आणि जुनैद कुरेशी यांच्यासह दहाजणांचा समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pune Crime: रंगकाम करताना घरमालकाला लावला चुना; पुण्यात 4 लाखांची चोरी करणाऱ्या प्रमोदला गोव्यात अटक

Horoscope: गुरुवारी 'गजलक्ष्मी योग'चा शुभ संयोग! 'या' 5 राशींच्या लोकांसाठी उद्याचा दिवस खूप खास, होणार मोठा धनलाभ; भगवान विष्णूचीही राहणार कृपा

Goa Crime: मुंगूल-मडगावातील गँगवॉरचा गोव्यातील अंडरवल्डशी संबंध; वॉल्टर गँगने 2 वर्षापूर्वीच्या मारहाणीचा घेतला बदला

Poco M7 Plus धमाका! खास मोबाईलप्रेमींसाठी पोकोने लॉन्च केला धमाकेदार स्मार्टफोन, Vivo आणि Realme चं वाढलं टेन्शन; जाणून घ्या अफलातून फीचर्स

Nitin Raiker: अभिमानास्पद! अग्निशमन दलाचे संचालक नितीन रायकर यांना भारत सरकारचा 'ब्रॉन्झ डिस्क मेडल' पुरस्कार जाहीर

SCROLL FOR NEXT