Mandrem Arambol Chopdem Road Dainik Gomantak
गोवा

Mandrem: वरवर खड्डे बुजवण्यापेक्षा ठोस उपाय हवा! चोपडे-हरमल येथे तात्पुरत्या उपायामुळे वाहनचालकांत संताप

Arambol Chopdem Road: मांद्रे मतदारसंघातील चोपडे ते हरमल या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली बिकट स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले, तरी ही दगड, वाळू सुके मिश्रण घालून तात्पुरती सोय केली.

गोमन्तक डिजिटल टीम

Potholes Patched but Roads Not Resurfaced At Mandrem Arambol Chopdem

हरमल: मांद्रे मतदारसंघातील चोपडे ते हरमल या रस्त्याची खड्ड्यांमुळे झालेली बिकट स्थिती सुधारण्यासाठी प्रशासनाने खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याने वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले, तरी ही दगड, वाळू सुके मिश्रण घालून तात्पुरती सोय केली. हा तात्पुरता मुलामा निरुपयोगी असून थेट डांबरीकरण योग्य होते, असे मत संतप्त वाहन चालकांनी व्यक्त केले.

दरम्यान, काल सकाळी पेट्रोल पंप परिसरात खड्ड्यांमध्ये सुके मिश्रण घालण्याचे काम सुरू होते. अनेक वाहन चालकांनी संताप व्यक्त केला. सुके मिश्रण नेमके काय परिणाम साधेल, खड्डे बुजवल्याचे समाधान आहे. मात्र, सततच्या वाहनांच्या वर्दळीमुळे मिश्रण सुटसुटीत होऊन केवळ धुरळा उडेल व त्याचा फटका पुन्हा वाहनचालक व नजीकच्या आस्थापनांना बसेल.कित्येक ठिकाणी फक्त माती टाकली,त्यावर रोलर फिरवलाच नाही,असे मत वाहन चालक अल्बेट डिसोझा यांनी व्यक्त केले.

सध्या पर्यटन हंगाम सुरू असून, पर्यटकांची जीवघेणी कसरत रस्त्यांतून होत असते. कित्येक अपघात झाले, कित्येकजण वाहनावरील ताबा जाऊन पडल्याने जखमी झाले होते. वरवर खड्डे बुजवल्याचे दाखवण्यापेक्षा ठोस उपाय हवा. पैशांचा अपव्यय टाळण्यास थेट डांबरीकरण व्हावे,असे मत अल्बेट डिसोझा यांनी व्यक्त केले.

हरमल बामणभाटी आगरनजीकचा साधारण दीडशे मीटरचा रस्ता पूर्णतः वाहून गेल्याने,चालकांची भंबेरी उडते, त्यात अपघात होण्याची शक्यता असून, त्या मार्गाचे किमान डांबरीकरण होणे गरजेचे आहे.
सर्वेश हरमलकर, वाहन चालक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT