Navdurga Temple Madkai Goa Dainik Gomantak
गोवा

Navdurga Temple Dispute: नवदुर्गेच्या समोर मंदिराच्या भटजींना मारहाण‌; मडकईत पुन्हा तणावाचे वातावरण

Navdurga Temple Priest Attack : ग्रामस्थ आणि मंदिरांच्या भटजींमध्ये संघर्ष झाला आणि ह्या प्रकारात देवस्थानच्या भटजींना मारहाण‌ करण्यात आली

Akshata Chhatre

Shri Navdurga Temple, Madkai

मडकई: श्रीनवदुर्गा संस्थान मडकई येथे गेल्या काही दिवसांपासून महाजन आणि गावकऱ्यांमध्ये मूर्ती हलवण्यावरून वाद सुरु आहेत. न्यायालयाचा आदेश येऊन देखील अद्याप हा वाद मिटलेला नाही. सोमवारी (दि. ९ डिसेंबर) रोजी मडकई नवदुर्गेच्या मंदिरात पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. ग्रामस्थ आणि मंदिरांच्या भटजींमध्ये संघर्ष झाला आणि ह्या प्रकारात देवस्थानच्या भटजींना मारहाण‌ करण्यात आली.

श्रीनवदुर्गा संस्थान मडकई येथे गेल्या काही दिवसांपासून महाजन आणि गावकऱ्यांमध्ये मूर्ती हलवण्यावरून वाद सुरु आहे. नवदुर्गा मंदिर हे सार्वजनिक मंदिर म्हणून घोषित करण्यात यावे व महाजनांना मूर्ती बदलण्यापासून कायमस्वरुपी मनाई करावी असा दावा करण्यात आला होता, मात्र फिर्यादीतील आरोप हे कारवाईचे भ्रामक कारण निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची याचिका महाजनांनी केली, मडकईच्या महाजनांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने उचलून धरली व जिल्हा न्यायालयाने दिलेला आदेश रद्दबातल ठरवला.

श्री नवदुर्गा मंदिर प्रतिष्ठान, मडकई यांनी त्यांची बाजू मांडताना सांगितले की मंदिरात या मूर्तींची अनेक वर्षापासून पूजा केली जात आहे. ते मंदिराच्या संदर्भात कोणत्याही अधिकाराचा दावा करत नाहीत.

तथापि त्यांचा एकमेव दावा महाजन या मूर्ती बदलण्याचा प्रयत्न करत आहेत यावर आहे. मूर्ती बदलाच्या निर्णयाला भाविकांनी विरोध केला होता, जो त्यांच्या मते अन्यायकारक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs PAK: 'जलेबी बेबी'! पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी वाजलं वेगळंच गाणं, दुबई स्टेडियममधील Video Viral

IND vs PAK: पाकिस्तानविरुद्ध पहिली विकेट घेताच पांड्यानं रचला इतिहास! अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय VIDEO

Tax Saving Tips: 15 लाख पगार घेत असाल? तरीही एक रुपयाही कर लागणार नाही, कसं ते जाणून घ्या

Panjim To Vengurla Bus: सिंधुदुर्गवासीयांच्या मदतीला धावली गोव्याची 'कदंब', पणजी–वेंगुर्ला बससेवा सुरू; प्रवाशांना दिलासा

Viral Video: पोलीस, बँड-बाजा आणि वरात! अशी अनोखी 'लव्ह मॅरेज' पाहून अख्खी वस्ती नाचली; व्हिडिओ पाहून नेटकरीही म्हणाले...

SCROLL FOR NEXT