Goa Temperature Update Dainik Gomantak
गोवा

Goa Temperature Update: गोव्यात उकाडा वाढतोय, पारा 33 अंशांवर

असह्य उष्मा; राज्यात शीतपेयांना मागणी वाढली, पहाटे धुके

दैनिक गोमन्तक

Goa Temperature Update

राज्यात आठवड्याभरापासून दुपारनंतर मोठ्या प्रमाणात उष्मा जाणवत आहे. राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३३ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक आहे. असह्य उष्‍म्यापासून बचावासाठी नागरिक शीतपेयांचे सेवन करत आहेत. त्यामुळे शीतपेयांची मागणी वाढली असून रसगृह, आईस्क्रिम पार्लरवर गर्दी दिसत आहे.

सायंकाळनंतर प्रामुख्याने घाटालगतच्या भागात थंडी पडत पडत असल्याने तेथील नागरिकांना रात्री उष्म्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. पुढील चार-पाच दिवस राज्यातील कमाल व किमान तापमानात मोठे बदल घडणार नाहीत.

राज्यातील हवामान कोरडे राहील तसेच पहाटे राज्यातील काही भागात धुके व दव पडण्याची शक्यता गोवा वेधशाळेद्वारे वर्तविण्यात आली आहे. आज पणजी येथे कमाल ३३.६ अंश सेल्सिअस तर किमान २३.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.

येत्या दोन दिवसांत पारा वाढणार असून, गोमंतकीयांना उन्हाचा चटका बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या आग्नेय भागातील बदललेल्या हवामानामुळे तापमानात वाढ होणार आहे. तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होईल, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

राज्यात १६ फेब्रुवारी रोजी कमाल तापमान ३५.७, तर किमान तापमान २२.६ अंश सेल्सिअस नोंदविले. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, आग्नेय दिशेकडून उष्ण आणि कोरडी हवा तसेच उत्तर कर्नाटक ते विदर्भातील हवामान बदलामुळे कमाल तापमान ३४ ते ३६ डिग्री सेल्सियस असेल.

... तापमान स्थिर!

येत्या २ दिवसांत राज्यातील सामान्य तापमानात २ ते ४ अंश सेल्सिअसने वाढ होईल. त्यानंतरच्या दिवसांत कमाल तापमानात हळूहळू घसरण होईल. पाच दिवसांत किमान तापमानात फारसा बदल अपेक्षित नाही, असे हवामान खात्याने म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Highway: जमिनी गेल्या, रस्ताही अडला; उगवेकरांचा संताप, एनएच 66 मुळे दैनंदिन जीवन विस्कळीत; मोबदल्याची अद्याप प्रतीक्षा

Bicholim Hit And Run Case: सुरक्षेचा 'तिसरा डोळा' ठरला कर्दनकाळ; अपघातानंतर पळणाऱ्या चालकाच्या मुसक्या आवळल्या, डिचोली पोलिसांची कारवाई

"वाघांचे मृत्यू अन् वन विभागाचे अपयश"; पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर यांचा थेट प्रहार!

Goa Crime: काकाची हत्या करून मावशीकडे घेतला आश्रय! बोरी येथील दीपक नाईक हत्या प्रकरणातील संशयित नराधम पोलिसांच्या तावडीत

Goa Accident: अटल सेतूवर विचित्र अपघात! 1 नाही, 2 नाही... 7 गाड्या एकमेकांना धडकल्या, वाहतूक विस्कळीत; Watch Video

SCROLL FOR NEXT