Actress Soumya Shetty Arrested Instagram
गोवा

Actress Soumya Shetty Arrest: अभिनेत्री सौम्या शेट्टीला अटक; 150 तोळे सोने चोरुन गाठला गोवा

Actress Soumya Shetty Arrested: सौम्याने विशाखापट्टणममधील एका सेवानिवृत्त पोस्टल कर्मचाऱ्याच्या घरातून 150 तोळे सोने चोरल्याचा आरोप आहे.

Pramod Yadav

Actress Soumya Shetty Arrested

तेलगू अभिनेत्री आणि सोशल मीडिया इन्फ्युएन्सर सौम्या शेट्टी हिला चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. सौम्याने विशाखापट्टणममधील एका सेवानिवृत्त पोस्टल कर्मचाऱ्याच्या घरातून 150 तोळे सोने चोरल्याचा आरोप आहे.

विशाखापट्टणम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्याविरोधात चोरीच्या चार वेगवेगळ्या घटनांची नोंद आहे. सोने चोरी केल्यानंतर सौम्या मौजमजा करण्यासाठी गोव्याला गेली.

गोव्यात मौजमजा करण्यासाठी आणि प्रवासासाठी तिला पैशांची गरज होती म्हणून तिने ही चोरी केली. सोने विक्री करुन मिळालेले पैसे घेऊन तिने गोवा गाठला.

चोरीचे पैसे घेऊन गोव्यात गेल्यावरही तिने रील बनवणे सुरू ठेवले होते. सेवानिवृत्त पोस्टल कर्मचाऱ्याच्या घरात चोरी करणारा चोर दुसरा कोणी नसून अभिनेत्री सौम्या शेट्टी असल्याचे या प्रकरणाचा तपास करणाऱ्या विशाखापट्टणम गुन्हे पोलिसांना आढळून आले आहे.

विशाखापट्टणम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सौम्याचे बाथरूममधून बेडरूममध्ये गेली. त्यानंतर तिने 150 तोळे सोन्याची चोरी केली. पोलिसांनी तिच्याकडून 74 ग्रॅम सोने जप्त केले असून, या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.

सौम्याला अटक करण्यात आली असून, पोलिस रिमांड देण्यात आला आहे. सौम्याचे इंस्टाग्रामवर 100 हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिने द ट्रिप, योर्स लव्हिंगली इत्यादी काही तेलुगू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nestle Case: नेस्लेला मोठा दिलासा! 300 कोटींच्या तक्रारीवर पडदा; "मॅगी सॉस घोटाळा" CCI ने फेटाळला

Rahul Gandhi: राहुल गांधींच्या कारखाली पोलिस कॉन्स्टेबल चिरडला? भाजपने शेअर केला व्हिडिओ Watch

Goa Crime: गोवा कॅसिनोचा नाद नडला! जुगार खेळण्यासाठी लुटले 30 लाख; दिल्लीत सोनारासह चौघे जेरबंद

गोव्यात घुमल्या पॅलेस्टाईन जिंदाबादच्या घोषणा; पणजी चर्च समोर इस्त्राईल विरोधात निदर्शने करणाऱ्यांना पोलिसानी घेतले ताब्यात

Mapus Theft: दोनापावला, म्हापसा येथील दरोड्यांचा धागा एकच? सराईत टोळीचा संशय; पोलिस यंत्रणेवर प्रचंड दबाव

SCROLL FOR NEXT