Theft Crime Canva
गोवा

Parra Villa Theft: पर्रा येथे व्हिलामध्ये चोरी! मूळच्या कर्नाटकातील संशयिताला पोलिसांकडून अटक; मुद्देमाल जप्त

Villa Theft Case Goa: पर्रा येथे व्हिलामध्ये उतरलेल्या तेलंगणामधील पर्यटकांचे सुवर्णालंकार व रोख चोरल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितास अटक केली.

गोमन्तक डिजिटल टीम

म्हापसा: पर्रा येथे व्हिलामध्ये उतरलेल्या तेलंगणामधील पर्यटकांचे सुवर्णालंकार व रोख चोरल्याप्रकरणी म्हापसा पोलिसांनी संशयितास अटक केली. पोलिसांनी या संशयिताकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून याची रक्कम ५ लाख रुपये इतकी आहे. याप्रकरणी पुंडलिक लक्ष्मण चव्हाण ऊर्फ लमाणी (२८) या मूळच्या कर्नाटकमधील (Karnataka) संशयिताच्या मुसक्या आवळल्या.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही चोरीची घटना ३१ रोजी घडली. संशयित हा पर्रा येथील व्हिलामध्ये रात्री घुसला. याप्रकरणी रक्षित गुप्ता हे फिर्यादी आहेत. संशयिताने व्हिलाच्या खिडकीमधून प्रवेश करीत फिर्यादीच्या पत्नीच्या बॅगेमधील कानातले, रोख दहा हजार, ब्रेसलेट चोरले. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत, संशयिताकडून दोन कानातले, रोख ८ हजार मिळून ५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिस उपअधीक्षक संदेश चोडणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक निखिल पालेकर यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक विशाल कुट्टीकर, अजय धुरी, हेड कॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील, महेंद्र मांद्रेकर, आनंद राठोड, प्रियेश पेडणेकर, राजेश कांदोळकर यांनी ही कारवाई केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Market: '..तर पालिकेसमोर मासे विकू'! वास्कोतील विक्रेत्यांचा पवित्रा; अन्यत्र मासळी विक्री बंदी, सायबिणीच्या स्थापनेची मागणी

Goa coastal survey: गोवा मुक्तीनंतरचे सर्वात मोठे सर्वेक्षण! किनारी भागांत धास्ती; बेकायदा बांधकामांवर होणार कारवाई

GCA: अखेर विषय संपला! रोहन गावस देसाईच ‘जीसीए’चे प्रतिनिधी; BCCI निवडणुकीसाठी शिक्कामोर्तब

Arambol: वृक्षतोड नाही, झाडी कापली! वन खात्याचा हास्यास्पद दावा; हरमलमध्ये संतापाची लाट

Goa Crime: बनावट ग्राहक पाठवला, सेक्स रॅकेटचा केला पर्दाफाश; मास्टरमाईंडला बेळगाव येथून अटक

SCROLL FOR NEXT