Water Dainik Gomantak
गोवा

मोफत पाण्याच्या योजनेमुळे ग्राहकांच्या डोळ्यात आनंदा ऐवजी दुःखाचे अश्रू

आनंदाचे अश्रू दुःखात रुपांतर झाले असल्याचे सत्तरी (Satari) तालुक्यातील काही ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले आहे.

दैनिक गोमन्तक

पिसुर्ले: राज्य सरकारने (State Government) मोठा गाजावाजा करून एक सप्टेंबर पासून नागरिकांना सोळा हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा करून अगोदर महागाई (Inflation) वाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या सामान्य जनतेच्या डोळ्यात आनंद अश्रू आणण्याचा प्रयत्न मात्र केला खरा परंतु सप्टेंबर महीन्याचे पाणी बिल हाती पडताच ते आनंदाचे अश्रू दुःखात रुपांतर झाले असल्याचे सत्तरी (Satari) तालुक्यातील काही ग्रामस्थांनी व्यक्त केलेल्या प्रतिक्रियेवरून स्पष्ट झाले आहे.

या बाबत काही ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार समजले की सरकारने काही महिन्यांपूर्वी संपन्न झालेल्या विधानसभा अधिवेशनात नागरिकांना दिलासा देण्यासाठी सोळा हजार लिटर पाणी मोफत देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी एक सप्टेंबर पासून करण्यात आली होती. या वेळी नागरिकांनी या योजनेचे स्वागत केले होते. परंतु सध्या नागरिकांना देण्यात आलेली पाणी बिलाची रक्कम पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आले आहे. या मध्ये अगोदर येणाऱ्या बिला पेक्षा दुप्पट तिप्पट बिले आली आहेत. त्यामुळे अगोदरपासूनच वाढत्या महागाईमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या नागरिकांना सदर बिले भरावी कशी असा प्रश्न पडला आहे. त्यामुळे नको ते सोळा हजार मोफत पाणी असे म्हणण्याची पाळी नागरिकांवर आली आहे.

या विषयी भुईपाल येथिल एका ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार समजले की त्यांना अगोदर महीन्याचे बिल एक हजाराच्या आसपास येत होते, परंतू सोळा हजार लिटर मोफत पाण्याची योजना लागू होताच 49 दिवसांचे 108 युनिट पडून 2753 रूपये बिल आले आहे. तर मग मोफत पाणी दिले कुठे, वरून या योजने अंतर्गत नागरिकांना वाढीव दराने युनिट लागू करून पैसे वसूल केले आहेत, हे स्पष्ट होत आहे. अशा प्रकारे या भागातील बऱ्याच जणांना बिले वाढुन आली आहेत अशी माहिती पंच सया पावणे यांनी देऊन सरकारने या प्रकरणी फेर विचार करावा अशी मागणी केली आहे.

या संदर्भात होंडा पंचायतीचे माजी पंच अशोक धावस्कर आपली तिखट प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की सरकारने सोळा हजार लिटर मोफत पाणी देण्याचे गाजर दाखवून नागरिकांची फसवणूक केली आहे, अगोदर एक ते दिड हजार रुपये पाणी बिल येणाऱ्या जागेवर ही मोफत बिलाची योजना लागू होताच तेवढ्याच दिवसांचे बिल तीन हजारांच्या आसपास आले आहे. त्यामुळे या वाढीव बिले पाहून नागरिकांच्या डोळ्यात अश्रू आले आहेत. या प्रकरणी सरकारने या योजनेचा फेर आढावा घेऊन पाणी बिले कमी करावी अशी मागणी धावस्कर यांनी केली आहे.

दरम्यान या वाढीव बिला मुळे सत्तरी तालुक्यातील सर्व भागात सरकारच्या या भुमिकेमुळे संतापाची लाट पसरली असून सर्व जण यांचा जाब विचारण्यासाठी वाळपई येथिल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागात धाव घेत असल्याचे दिसून आले आहे. त्याच प्रमाणे काही जणांनी वाढीव बिले न भरण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे या वाढीव बिला मुळे नागरिकांना नको ती भिक पण कुत्रा आवर म्हणण्याची वेळ आली आहे हे मात्र नक्की.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Bike Stunt Video: काळजाचं पाणी करणारा थरारक स्टंट! पठ्ठ्याचा डोकं चक्रावणारा व्हिडिओ व्हायरल; जीवाची लावली बाजी

Shani Gochar 2026: शनिदेव देणार 5 राशींना श्रीमंतीचं वरदान! हाती लागणार कुबेराचा खजिना; करिअरला मिळणार नवा बूस्ट

Colvale Jail Employee Stress: अभद्र युतीमुळे प्रामाणिक कर्मचाऱ्यांचा गुदमरतोय जीव! सुधारगृह गुन्हेगारांचा अड्डा; मानसिक आरोग्य कक्ष व छळविरोधी समित्यांची तातडीची मागणी

Crime News: आधी विषारी कोल्ड्रिंक पाजले, मग गळा आवळून केला खून! 20 वर्षांच्या संसारानंतर बायकोनेच नवऱ्याचा काढला काटा; कारण ऐकून व्हाल अवाक

Jitesh Kamat Colvale Jai: कोलवाळ मध्यवर्ती कारागृहाची सद्यस्थिती पाहता, 'गुन्हेगारांना आलिशान सुविधा पुरवणारे हॉलिडे होम' - जितेश कामत

SCROLL FOR NEXT