नोकरीसाठी गोव्यात आले आणि अंमली पदार्थ विकत बसले...

दोघांना अटक, एनएसीची कारवाई ; पणजीत 8.70 लाखांचे अंमली पदार्थ जप्त
Goa Drug Case : Drugs worth Rs 8.70 lakh seized in Panajim
Goa Drug Case : Drugs worth Rs 8.70 lakh seized in PanajimDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : किनारपट्टी क्षेत्रात सुरू असलेली ड्रग्जची विक्री (Goa Drug Case) आता राजधानी पणजी शहरातही (Panjim City) पोहचली आहे. अंमलीपदार्थविरोधी (Drug Case) कक्षाच्या पथकाने (एएनसी) काल मध्यरात्रीच्या सुमारास आंध्रप्रदेश व ओडिसातील दोघा तरुणांना अटक करून त्यांच्याकडून 8 किलो 700 ग्रॅम गांजा जप्त केला. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुमारे 8 लाख 70 हजार रुपये असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सूरज हळर्णकर यांनी दिली.

Goa Drug Case : Drugs worth Rs 8.70 lakh seized in Panajim
खाणकामाशी संबंधित गोष्टी वेळेवर निकाली काढु; CM सावंत

पोलिसांनी अटक केलेल्या संशयितांची नावे वूनगरला पट्टभी रामा मौलाली सुभाराव (40 वर्षे) व संतोष कुमार आचार्य (35 वर्षे) अशी आहेत. त्यांना आज संध्याकाळी न्यायालयात उभे करून पोलिस कोठडी घेण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पणजी शहरातील पाटो या परिसरात रात्रीच्यावेळी ड्रग्ज विक्रेते संशयास्पद फिरत असल्याची ठोस माहिती या कक्षाच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार या पोलिसांनी काल संध्याकाळपासून साध्या वेशातील पोलिस गस्त ठेवण्यात आली होती. संशयितांच्या वर्णानाची माहिती पोलिसांना मिळाली होती. रात्री पावणेदहाच्या सुमारास पाटो - पणजी परिसरात वर्णनाशी मिळतेजुळते तरुण आले असता त्यांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याजवळ गांजा सापडला. ते ग्राहकांच्या शोधात आले होते. हे दोघेही संशयित काही दिवसांपूर्वीच गोव्यात नोकरीच्या शोधात आले होते. नोकरी मिळणे कठीण झाल्याने त्यांनी दलालांकडून गांजा घेऊन विक्री सुरू केली होती अशी माहिती प्राथमिक तपासात पुढे आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Shashank Narvekar Mental Healt
Colvale Jail Holiday Home
Drug Network From Jail
 Supreme Court Stray Dog Directions
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com