Sonali Phogat  Dainik Gomantak
गोवा

Sonali Phogat Case : ‘सीबीआय’ची धडक ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टवर

सोनाली फोगट मृत्यू प्रकरणी वागातोरमध्ये दिवसभर केली संबंधितांची कसून चौकशी

गोमन्तक डिजिटल टीम

Sonali Phogat Case : भाजप नेत्या तथा अभिनेत्री सोनाली फोगट यांच्या मृत्युप्रकरणी गोवा पोलिसांनी ज्या वागातोर येथील ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टकडे दुर्लक्ष केले होते, तेथेच शनिवारी सीबीआयने पहिली धडक देत दिवसभर अनेक बाबींची तपासणी केली. याच हॉटेलमध्ये सोनाली यांना पहिल्यांदा ड्रग्स देण्यात आले होते. शिवाय ड्रग्सपुरवठा करणारे दोन्ही संशयित याच हॉटेलमध्ये काम करत होते. हाच धागा पकडून आज सीबीआयच्या पथकाने तेथे चौकशी आणि तपास केला.

सीबीआयचे पथक सध्या गोव्यात आले असून, शनिवारी (17 सप्टेंबर) सकाळी 11.45 च्या सुमारास सीबीआयची टीम सोनाली फोगट या उतरलेल्या वागातोर येथील ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टवर दाखल झाली. यावेळी हणजूण पोलिसांनी माध्यम प्रतिनिधींना रिसॉर्टच्या गेटबाहेरच रोखले.

‘कर्लिस’चीही चौकशी

यावेळी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी रिसॉर्टच्या परिसराची पाहणी केली. तसेच अधिकाऱ्यांकडून रिसॉर्टची एण्ट्री व एक्झिट पाँईट तसेच रस्त्याचे छायाचित्र व व्हिडिओ घेतले. सीबीआय पथकाकडून कर्लिस रेस्टॉरंटचीही पाहणी होईल, असे सूत्रांनी सांगितले.

गोवा पोलिसांकडून रिसॉर्ट दुर्लक्षित

सोनाली यांच्या मृत्यूनंतर पहिल्यांदाच सीबीआयकडून या रिसॉर्टची इतकी तपशीलवार तपासणी झाली. यापूर्वी गोवा पोलिसांचा फक्त कर्लिस रेस्टॉरंटच तपासणीचा केंद्रबिंदू होता. सोनाली फोगट या गोव्यात दाखल होताच त्या या ग्रॅण्ड लिओनी रिसॉर्टवर वास्तव्यास होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

Goa Ranji Trophy 2026: बडोद्याकडून पराभवाचा झटका; मोहित रेडकर, दीपराज गावकर यांना गोव्याच्या रणजी संघातून डच्चू!

SCROLL FOR NEXT