Goa Culture Dainik Gomantak
गोवा

Goa Culture: कुंभारजुवेतील सांगडोत्सवात ‘टीम-45’ पथकाची बाजी

Goa Culture: सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेला श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचा वार्षिक सांगडोत्सव यंदा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला.

दैनिक गोमन्तक

Goa Culture: सुमारे दीडशे वर्षांची परंपरा असलेला श्री शांतादुर्गा कुंभारजुवेकरीण देवीचा वार्षिक सांगडोत्सव यंदा मोठ्या थाटात साजरा करण्यात आला. ‘टीम ४५’ या पथकाने साकारलेल्या ‘दशमुख रावण द्वारा आक्रमण या चित्ररथाला प्रथम पारितोषिक प्राप्त झाले.

सार्वजनिक सरस्वती उत्सव मंडळाला दुसरे,तर पेट्रिक ग्रुप यांना तिसरे पारितोषिक प्राप्त झाले.तर उत्तेजनार्थ स्पार्कलिंग स्पोर्ट्स क्लब अर्धनारी नटेश्वर स्वरूप आणि ज्ञानदीप कला मंडळ यांना मिळाले.

उत्सवाप्रसंगी सर्वांनी धर्म, जात, पात बाजूला ठेवून गुण्यागोविंदाने नांदले पाहिजे. ही आमच्या पुर्वाज्यांची शिकवण आहे. आमच्या परंपरागत संस्कृतीचे येणाऱ्या पिढीला ज्ञान अवगत व्हावे व त्यांना प्रेरणा देण्यासाठी अशा सांगडोत्सव सारख्या परंपरा जपण्याची आज नितांत गरज आहे. त्यासाठी पर्यटन खात्यातर्फे तुम्हाला सतत पाठिंबा राहील,असे उद्गगार पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी कुंभारजुवे येथे सांगडोत्सव बक्षीस वितरण सोहळ्यात बोलताना काढले.

कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे, स्थानिक आमदार राजेश फळदेसाई , डेक्कन फायन केमिकलचे अधिकारी गौरव कुडचडकर , सरपंच नंदकुमार शेट , तिवरेचे सरपंच जयेश नाईक, बेतकीचे विशांत नाईक, सांत-इस्तेवच्या सरपंच स्मिता सावंत व अन्य पंचायत सदस्य उपस्थित होते .

पुढच्या सांगाडोत्सवात यावर्षा पेक्षा दुप्पट म्हणजे एक लाखाचे पहिले बक्षीस ठेवण्यात येईल. सांगडोत्सव हा राज्योत्सव करण्यासाठी मी सरकार दरबारी प्रयत्न करत आहे, असे सांगून आमदार राजेश फळदेसाई यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

टी-20, वनडे आणि कसोटी... हरमनप्रीत कौरने अचानक सोडले सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद, टीम इंडियाची धुरा आता कोणाकडे? 'या' खेळाडूचं नाव चर्चेत

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाकडून कर्मचाऱ्यांना मोठ्या अपेक्षा! पगारवाढीपलीकडे OPS, कॅशलेस मेडिकलपासून रिस्क अलाऊन्सपर्यंत 'या' 9 प्रमुख मागण्या

गोव्यात सर्वात मोठा समाज, पण CM फक्त एकच; रवी नाईकांनंतर भंडारी समाजातील दिग्गज नेत्यांना संधी का मिळाली नाही? 2027 मध्ये दामू नाईकांचं काय?

Flydubai Flight Hijacking Plot: फ्लाईदुबई विमान हायजॅक मागे इराणचा हात? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा; 9/11 सारखा हल्ला घडवण्याचा होता प्लॅन VIDEO

Shivaji Maharaj Statue: पुतळा हटवण्याऐवजी जागाच खरेदीचा प्रस्ताव; सरकारच्या धोरणावर गोवा खंडपीठ नाराज

SCROLL FOR NEXT