विर्डी दोडामार्ग येथे मुलांना शिकवताना केरी सत्तरी विद्यालयाच्या शिक्षिका रुत्वा गावस
विर्डी दोडामार्ग येथे मुलांना शिकवताना केरी सत्तरी विद्यालयाच्या शिक्षिका रुत्वा गावस Dainik Gomantak
गोवा

Goa: केरी सत्तरीतील शिक्षकांची गावोगावी जाऊन शिकवणी सुरू

दैनिक गोमन्तक

पर्ये - केरी सत्तरीतील (Keri sattari) सरकारी माध्यमिक विद्यालयाच्या (Government High school) शिक्षकांनी गावोगावी भेटी देऊन विध्यार्थ्यांना शिकवण्याचा उपक्रम सुरू केला आहे. सत्तरीतील या ग्रामीण भागात बऱ्याच ठिकाणी मोबाईल नेटवर्कची समस्या नसते तसेच काही गरीब विद्यार्थांकडे मोबाईल संच नाही. त्यामुळे या भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतात. त्याचबरोबर जे विद्यार्थी ऑनलाईन शिकवणीसाठी (online teaching) असतात त्यांना ही अभ्यासक्रम समाजण्यासंबंधी बऱ्याच समस्या असतात. (Teachers have started an initiative to teach students by visiting villages.)

अशा समस्यांवर उपाय काढीत विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक वर्गाने आठवड्यातून एक दिवस प्रत्येक गावोगावी जाऊन त्या भागातील मुलांना शिकवायला सुरुवात केली. यावेळी शिक्षकांचे एकूण 11 गट केले व या गटांतील शिक्षकांनी केरी, घोटेली 1, घोटेली 2, धनगरवाडा, विर्डी, शिरोली, हद्दवाडी, मोर्ले, चौथुरावाडा अशा आठ गावांमध्ये जाऊन मुलांना शिकवले. यावेळी शिक्षकाकडून मुलांना शिकवणे, कठीण विषयाची उजळणी करणे अशा उपक्रम राबविले. त्याचबरोबर त्या परिसरतील ऑफलाईन विद्यार्थ्यांवर विशेष लक्ष दिले गेले.

यासंबंधी केरी सरकारी विद्यालयाचे मुख्याध्यापक मेलविन डीकोस्टा यांनी सांगितले की आमच्या विद्यालयात केरी, शिरोली, विर्डी, हद्दवाडी सारख्या मोबाईल नेटवर्क नसलेल्या भागातून विद्यार्थी शाळेत येतात. अशा विद्यार्थी ऑनलाईन शिकवणीसाठी उपलब्ध असत नाही. आमच्या शाळेत एकूण 47 विद्यार्थी ऑफलाईन असतात. शिक्षणापासून विद्यार्थी वंचित राहू नये व सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध व्हावी म्हणून आम्ही हा उपक्रम सुरू केला आहे. आम्हाला या उपक्रमाला विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. दर आठवड्याला एकदा वेगवेगळे शिक्षक त्या त्या भागात जाऊन शिकवणी करणार आहे. त्यासाठी वेळापत्रक तयार केले आहे असे त्यांनी सांगितले.

दरम्यान विद्यालयाने राबवलेल्या या उपक्रमाला विद्यार्थी वर्गाने चांगला प्रतिसाद दिला आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शिक्षकांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी उपलब्ध झाली असल्याने मुलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर पालक वर्गांने शिक्षकांच्या या उपक्रमाबाबत कौतुक केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Final Vote Turnout: गोव्यात 75.20 टक्के मतदान

Goa Today's Top News: लोकसभा मतदानाला उत्सफूर्त प्रतिसाद, आता नजर निकालाकडे; गोव्यातील ठळक बातम्या

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

SCROLL FOR NEXT