Goa CM Dr. Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

शिक्षक घरचा राग मुलांवर काढतात की काय? असले प्रकार खपवून घेणार नाही, Goa CM सावंत यांचा इशारा

Goa CM Pramod Sawant: कामुर्ली येथे शाळेत घडलेला प्रकार हा निंदनीय असून असे प्रकार घडणे ही आमच्यासाठी शरमेचे गोष्ट असल्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केले.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: राज्यात हल्लीच विद्यार्थ्यांना मारहान करण्याच्या दोन-तीन घटना घडल्या आहेत. शिक्षक विद्यार्थ्यांसोबत असे कसे काय वागू शकतात ? याचेच मला आश्चर्य वाटते. शिक्षक आपल्या घरी घडलेल्या घटनांचा राग त्या मुलांवर काढतात की काय ? असे मला वाटू लागले आहे, परंतु असले प्रकार खपवून घेणार नसल्याचा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला.

नसून काल कामुर्ली येथील घडलेल्या प्रकारावर हलगर्जीपणा केला जाणार नाही. त्या शिक्षिकेचे शिक्षण खात्याद्वारे निलंबनासहितच पोलिसांकरवी योग्य ती कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत माध्यमांशी बोलताना दिली.

शिक्षिकेवर कारवाईचे आदेश : झिंगडे

कामुर्ली येथे शाळेत घडलेला प्रकार हा निंदनीय असून असे प्रकार घडणे ही आमच्यासाठी शरमेचे गोष्ट आहे. जनावरांनाही अशा रितीने कोणी मारहाण करीत नाही. त्या लहान मुलाला मारहाण करणाऱ्या शिक्षिकेबाबत योग्य ती कारवाईचे आदेश शाळेच्या व्यवस्थापनाला दिले आहेत.

एखादी लहान घटना जरी घडली तरी शाळा व्यवस्थापन शिक्षण संचालनालयाला कळवत असते. ज्या प्रकारे मुलाला मारहाण केली आहे, त्याबाबत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे शिक्षण संचालक शैलेश झिंगडे यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: "ते म्हणणं शाब्दिक अर्थाने घेऊ नका", सत्यविजय नाईकांचे 'बॅकस्टॅबिंग'; दामू नाईकांचे स्पष्टीकरण

'बर्च' प्रकरणी सह-मालक अजय गुप्ताला 5 दिवसांची पोलीस कोठडी; बनावट प्रमाणपत्रे आणि फसवणुकीचा पर्दाफाश

Rohit Sharma Century: 'हिटमॅन'चा झंझावात! रोहित शर्मानं ठोकलं वादळी शतक; सचिन-विराटच्या 'स्पेशल' क्लबमध्ये सामील VIDEO

Goa Politics: 'फ्रेंडली फाईट' ही संकल्पनाच मला मान्य नाही; 2027 साठी काँग्रेसचा आक्रमक पवित्रा, आलेमाव यांचे मोठे वक्तव्य

Gold Silver Rate: इतिहासात पहिल्यांदाच! 10 ग्रॅम सोन्याचा दर 1.38 लाखांच्या पार, तर चांदी सव्वा दोन लाखांवर; आजवरचे मोडले सगळे रेकॉर्ड्स

SCROLL FOR NEXT