Taxi association leader Sudip Tamhankar Dainik Gomantak
गोवा

Pernem Taxi Stand Issue : ‘मोपा’वरील टॅक्सी स्टॕंडचा प्रश्‍न सुटणार

सुदीप ताम्हणकर : विघ्नसंतोषी लोकांनी दिशाभूल थांबवावी

गोमन्तक डिजिटल टीम

Pernem : मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पेडण्याचे आमदार प्रवीण आर्लेकर तसेच वाहतूक अधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत तोडगा निघाला असून लवकरच पेडणेतील टॅक्सीचालक बांधवांसाठी मोपा विमानतळावर हक्काचा टॅक्सी स्टॅन्ड अधिसूचित होणार आहे.

मात्र, पेडण्यातील काही संघटना टॅक्सीचालक बांधवांची दिशाभूल करून दुफळी पाडण्याचा प्रयत्न करत असून त्यांनी दिशाभूल करणे थांबवावे, असे आवाहन टॅक्सी असोसिएशनचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी पेडणे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केले.

यावेळी टॅक्सीचालक बांधव आणि असोसिएशनचे पदाधिकारी रुपेश कुंब्रलकर , राजू नर्से, प्रदीप पटेकर , उद्देश धावस्कर, विश्वास नारोजी, राहुल कोलवाळकर , सत्यवान गडेकर, प्रकाश आंबेकर, संदेश आदी टॅक्सीधारक उपस्थित होते.

ताम्हणकर म्हणाले की,वाहतूक नियमानुसार पेडणे तालुक्यासाठी हा टॅक्सी स्टँड मिळणार आहे त्यासाठी माझे टॅक्सीधारकांना आवाहन आहे की त्यांनी ‘पीसीपीओ’ फॉर्म वाहतूक खात्याकडे भरावा. त्यानंतरच त्यांना प्राधान्याने व्यवसाय संधी मिळणार आहे.

काहीजण विघ्नसंतोषी लोक आठकाठी आणत आहेत.आमदार आणि स्वतः मुख्यमंत्री यांनी हा प्रश्न सोडवण्याचा आम्हाला शब्द दिलेला आहे व सरकारी अधिकारी कामाला लागले आहेत. लवकरच हा स्टॅन्ड अधिसूचित होणार आहे.त्यासाठी सरकार व मुख्यमंत्र्यांबाबत अपप्रचार करू नये, असे आवाहन सुदीप ताम्हणकर यांनी केले.

टॅक्सी व्यवसायाचा गंध नसलेले एका संघटनेचे प्रतिनिधी ॲड. प्रसाद शहापूरकर ,निवृत्त अधिकारी भास्कर नारुलकर व टेंपो ट्रॅव्हलचे मालक उदय महाले हे चुकीची माहिती देऊन दिशाभूल करत आहेत. टॅक्सीधारक बांधवांचा टॅक्सी स्टँडचा प्रश्‍न सुटण्याची वेळ आली आहे. जे लोक नको ती कारणे पुढे करत आहेत, त्यांनी अपप्रचार थांबवावा, असे आवाहन सुदीप ताम्हणकर यांनी केले.

टॅक्सी धारक राजू नर्से म्हणाले की टॅक्सी व्यवसायाची निगडित असलेल्या आणि ज्याला त्या व्यवसायाचा ज्ञान असलेले असे नेते सुदीप ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक महिने पेडणे तालुक्यातील टॕक्सीधारक बांधवाच्या हितासाठी प्रयत्न करत आहे.

सुदीप ताम्हणकर यांच्या नेतृत्वाखाली आज टॅक्सीधारक बांधव गेले अनेक महिने मोपा विमानतळावर टॅक्सी स्टॅंड अधिसूचित व्हावा म्हणून प्रयत्न करत आहेत. नुकतीच मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मोपावर टॅक्सी स्टॅंड अधिसूचित करण्याचा शब्द दिला आहे. पण काहीजण यात विघ्न आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

-रुपेश कुंब्रलकर,टॅक्सी ओनर्स असो.पदाधिकारी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT