Arambol Private Car Issue Dainik Gomantak
गोवा

संतप्त टॅक्सी व्यावसायिकांनी अडवली गाडी; हरमल येथे खासगी कारमधून पर्यटकांची ने-आण; पोलिस, वाहतूक खात्याच्या कारभारावर टीका

Arambol Private Car Operators: विदेशी पर्यटक खासगी कारमधून पर्यटकांची विमानतळ व अन्य हॉटेलमध्ये ने- आण करून भाडी घेत असल्याने,या भागातील संतप्त टॅक्सी व्यावसायिकांनी खासगी वाहन अडवले व पोलिसांना पाचारण केले.

गोमन्तक डिजिटल टीम

हरमल: येथील पर्यटन हंगामात विदेशी पर्यटक खासगी कारमधून पर्यटकांची विमानतळ व अन्य हॉटेलमध्ये ने- आण करून भाडी घेत असल्याने,या भागातील संतप्त टॅक्सी व्यावसायिकांनी खासगी वाहन अडवले व पोलिसांना पाचारण केले.

या परिस्थितीत,भागातील शंभरेक टॅक्सी व्यावसायिकांनी संतप्त सुरात पोलिस व वाहतूक खात्याच्या कारभारावर सणकून टीका केली.

काल दुपारी ११ च्या सुमारास (जीए ०३ ए एफ ५८०३) या खाजगी स्विफ्ट कारमधून विदेशी पर्यटक,अन्य दोन विदेशी प्रवाशांना घेऊन विमानतळकडे जात होता. याची कुणकूण लागताच संतप्त टॅक्सी व्यावसायिकांनी वाहन रोखून धरले व दंडात्मक चलन देण्याचा आग्रह धरला.

सदर विदेशी पर्यटक इंग्रजी अज्ञानीपणाचा आव आणून पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न करीत होता.आपण मिलिटरीत असल्याचे सांगितले व इथले कायदे माहीत नाही का, असे विचारताच, त्यांनी इंग्रजी येत नसल्याचे भासवू लागला.त्यावेळी टॅक्सी व्यावसायिकांच्या एकजुटीमुळे वाहतूक खात्याच्या अधिकाऱ्यांनी त्याच्यावर अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला,असे वाहतूक सहाय्यक निरीक्षक महाले यांनी सांगितले.

सदर पर्यटक गेल्या आठवड्यात असेच भाडे घेऊन गेल्याचे पाहिल्याने टॅक्सी व्यावसायिक जोजी फर्नांडिस यांनी तीव्र संताप व्यक्त केला. स्थानिक टॅक्सी व्यावसायिकांनी पोट कसे भरावे असा सवाल आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mark Zuckerberg News: चाइल्ड पोर्नोग्राफी आणि डीपफेक कंटेंटवरुन मोदी सरकार आक्रमक, मार्क जुकरबर्गने मागितली माफी; मेटाच्या अधिकाऱ्यांना पुन्हा समन्स

India vs Sri Lanka: स्वातंत्र्यदिनी टीम इंडिया रचणार इतिहास! अशी कामगिरी करणारा भारत ठरणार जगातील तिसराच; श्रीलंकेत गिल ब्रिगेड करणार कमाल

Navpancham Rajyog 2026: सूर्य-शनिच्या नवपंचम राजयोगानं उजळणार 5 राशींचं भाग्य; धनलाभासह करिअरमध्ये मिळणार प्रचंड यश!

CJP Paper Leak Protest: पेपरफुटीच्या वादात युवाशक्तीचा मोठा विजय! प्रधानांचा राजीनामा अन् मोदी सरकारचा नतमस्तक होणारा पराजय?

Gold Silver Rate: सोन्याचा भाव गगनाला भिडला! 1 लाख 46 हजारांचा टप्पा केला पार, चांदीनेही गाठला नवा उच्चांक; जाणून घ्या आजची किंमत

SCROLL FOR NEXT