Dhargal Fatal Accident
Dhargal Fatal Accident Dainik Gomantak
गोवा

Dhargal Fatal Accident: अपघात की घातपात? धारगळ येथे मालवाहू रिक्षाच्या धडकेत युवक ठार

Pramod Yadav

Dhargal Fatal Accident

मालवाहू रिक्षाच्या धडकेत युवक ठार झाल्याने रविवारी रात्री दाडाचीवाडी धारगळ येथे अकराच्या सुमारास मोठा गोंधळ झाला. अपघातानंतर स्थानिकांनी सुमारे सहा तास नागझर जंक्शनवरील रस्ता रोखून धरला.

पोलिसांनी संशयिताच्या अटकेचे आश्वासन दिल्यानंतर मार्ग मोकळा केला. दरम्यान, ही घटना अपघात नव्हे तर घातपात असल्याचा दावा स्थानिकांनी केला आहे.

देविदास उर्फ देवू कोनाडकर (वय 47) असे या अपघातात ठार झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दुचाकी चालक देविदास आणि संशयित रिक्षाचालक यांच्यात रोड रेजवरुन वाद झाला होता.

वादानंतर रिक्षा चालकाने दुचाकी चालकाचा पाठलाग केला व दुचाकीला मागून धडक दिली. एवढेच नव्हे तर रिक्षा चालकाने दुचाकी चालकाला फरफटत नेले. या जखमी झालेल्या दुचाकी चालक देविदास याचा मृत्यू झाला.

देविदास यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, पोलिसांनी त्याला मृत घोषित केले. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला मात्र, संतप्त स्थानिकांनी नागझर जंक्शनवरील रस्ता रोखून धरला.

देविदास व्यवसायाने टॅक्सी चालक असल्याने रस्ता रोखोमध्ये सहभागी अनेकजण टॅक्सी चालक असल्याची माहिती समोर आलीय. दरम्यान. पोलिसांनी संशयिताला अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर संतप्त जमावाने मार्ग मोकळा केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अज्ञात युवकांकडून म्हावळींगे गावात 'भू-सर्व्हेक्षण'; संतप्त गावकऱ्यांनी सर्व्हेचे काम रोखले, संशयित ताब्यात

Goa Todays Live Update: राहुल गांधींविरोधात फोंड्यात पोलिस तक्रार!

Bloomberg Billionaires Index: एलन मस्क यांनी पुन्हा दाखवला जलवा, संपत्तीत मोठी वाढ; अदानी-अंबानींच्या संपत्तीत घट

Goa Film City: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Dam Water Level: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

SCROLL FOR NEXT