Goa Taxi  Dainik Gomantak
गोवा

Goa Taxi: टॅक्सी चालक ॲप नोंदणीसाठी ऑनलाईन उपलब्ध; नोंदणी असलेल्या टॅक्सींनाच 'मोपा'वर मिळणार भाडे

महामंडळाच्या संकेतस्थळावरून नोंदणीचा पर्याय

Akshay Nirmale

Goa Taxi: राज्यात टॅक्सी ॲप प्रश्‍न अजूनही वादाच्या भोवऱ्यात असताना गोवा पर्यटन विकास महामंडळाने मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरील टॅक्सी सेवेसाठी गोव्यातील टॅक्सी चालकांसाठी जीईएलने तयार केलेले गोवा टॅक्सी चालक ॲप नोंदणीसाठी आजपासून ऑनलाईनद्वारे उपलब्ध केला आहे. ही नोंदणी महामंडळाच्या संकेतस्थळावरून करण्याचा पर्याय ठेवला आहे.

या गोवा टॅक्सी चालक ॲपवर नोंदणी असलेल्या टॅक्सींनाच मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळावर उपलब्ध करण्यात येणाऱ्या टॅक्सी काऊंटरवरून भाडे दिले जाणार आहे व त्यांनाच या ॲप योजनेअंतर्गत सरकारच्या इतर सुविधांचा लाभ उपलब्ध होणार आहे. या नोंदणीसाठी अखिल गोवा पर्यटन तसेच भारतातील परमिट असलेल्या टॅक्सींना या मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ संधी दिली जाणार आहे. पेडण्यातील टॅक्सी ऑपरेटर्सना प्राधान्य दिले जाईल मात्र त्यासाठी त्यांच्याकडे 31 डिसेंबर 2022 पूर्वीचे परिमट असणे आवश्‍यक आहे.

महामंडळाने आज उपलब्ध केलेल्य गोवा टॅक्सी चालक ॲपवर टॅक्सी मालक व चालकाला त्याच्या टॅक्सीची सविस्तर माहिती तसेच असलेले परमिट याची माहिती ऑनलाईन पद्धतीने भरावी लागणार आहे. मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ हे 5 जानेवारीपासून प्रवासी विमानांसाठी सुरू केले जाणार असल्याने हे ॲप लवकरच सुरू करण्याचा महांडळाचा प्रयत्न आहे.

पेडण्यातील स्थानिकांना टॅक्सी व्यवसायाकडे आकर्षित होण्यासाठी गोवा माईल्सने कोणतीही रक्कम न भरता त्यांना कर्जाने टॅक्सी उपलब्ध करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. गोवा माईल्स ॲपमधून सेवा देताना त्यांनी या टॅक्सीचे कर्ज फेडायचे असून हे कर्ज पूर्ण फेडल्यानंतर टॅक्सी संबंधित चालक टॅक्सीचा मालक ठरणार आहे. पेडण्यातील काळ्या पिवळ्या टॅक्सी चालकांना मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वेगला टॅक्सी काऊंटर हवा आहे. हे विमानतळ पेडण्यात झाले असल्याने स्थानिकांना रोजगार मिळावा असे त्यांचे मत आहे. या टॅक्सी चालकांचे मन वळवण्याचे प्रयत्न स्थानिक आमदार व काही मंत्र्यांकडून होत असले तरी त्यात अजूनही फारसे यश आलेले नाही.

राज्यात सुमारे 20 हजाराच्या आसपास विविध प्रकारच्या टॅक्सी आहेत. त्यामध्ये गोव्यातील परमिट असलेल्या गोवा टॅक्सी तसेच गोवा-कर्नाटक व महाराष्ट्र अशा तीन राज्यांचे परमिट असलेल्या ऑल इंडिया टॅक्सी मिळून सुमारे 12 हजार पर्यटन टॅक्सी आहेत. याशिवाय रेंट अ कार व काळ्या-पिवळ्या टॅक्सींचाही समावेश आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Civil Service Transfers: गोवा नागरी सेवेत फेरबदल! गुरुदास देसाई यांची जिल्हाधिकारीपदी वर्णी तर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या

Mandre Panch Sexual Harassment Case: पंच रॉबर्ट फर्नांडिसविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी; महिलेचा छळ अन् मारहाण प्रकरणात

Mapusa ITI Fire Safety Course: 10वी पास तरुणांसाठी सरकारी रोजगाराची सुवर्णसंधी! म्हापसा 'ITI'मध्ये 24 जागांसाठी प्रवेश, एक वर्षाचा अभ्यासक्रम

Goa Crime Case: दोरीने गळा आवळला, पण मारेकरी कोण? गोव्यात गाजलेल्या 'अनमोड घाट' हत्येचा शेवट; चौघांची निर्दोष सुटका

PM Jan Dhan Yojana Goa: 2,35,200 नागरिकांपर्यंत पोहोचल्या बँकिंग सुविधा! जनधन योजनेत गोव्यातील 'कॅनरा बँक' अव्वल; केंद्रीय अर्थमंत्र्यांनी दिली आकडेवारी

SCROLL FOR NEXT