Goa Panchayat Audit:पर्वरी: राज्यातील प्रत्येक पंचायतीच्या नाकाखाली कर चुकवेगिरीचा घोटाळा सुरु आहे, असा आरोप बाणावलीचे आमदार वेंझी व्हिएगस यांनी केला. पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी याची दखल घेत घरपट्टी वसूल न करणाऱ्या पंचयातींवर कारवाईचा दिला.
राज्यात प्रत्येक पंचायतीत सर्रास कराची चुकवेगिरी सुरु आहे. यासाठी काय उपाययोजना करायला हवी याबाबत कोणच काही सांगत नाहीये. भाडे तत्वावर असलेल्या आणि व्यावसायिक आस्थापना रहिवासी आस्थापनांपेक्षा जास्त कर देतात.
पण, बाणावलीत जेव्हा मी फिरतो तेव्हा काही घरांमध्ये रुम आहेत, काहींनी गेस्ट हाऊस केले आहे. ही घरे १०४० पंचायतीच्या घरांमध्ये समाविष्ट नाहीत. यामुळे कर गोळा होत नाही आणि मोठा फटका बसतो. हा सगळा प्रकार परराज्यातील लोक करतायेत, यात गोमंतकीयांचा समावेश नाही.
पंचयात संचालकांनी भाडेतत्वावरील नोंदणीकृत नसलेल्या आस्थापना ओळखून निश्चित करण्यासाठी कोणती प्रणाली वापरली आहे? आशा आस्थापनांनी पाणी आणि वीजेचा केलेल्या वापराची ऑनलाईन पडताळणी केली का? असा प्रश्न व्हिएगस यांनी सभागृहात उपस्थित केला.
याला उत्तर देताना पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी राज्यातील पंचायतींनी घरपट्टी व्यवस्थित गोळा करायला हवी, असे व्हिएगस सांगू पाहतायेत असे म्हणाले. राज्यात अनेकजण घरपट्टी भरत नाहीयेत. ०१ ऑगस्टपासून आम्ही सर्व गोष्टी ऑनलाईन करत आहोत. त्यानंतर आम्हाला सर्व माहिती मिळेल. कर थकीत असलेल्यांना कर भरणार नाही तोपर्यंत पंचायतींना प्रमाणपत्र आणि कोणतेही सहकार्य मिळणार नाही, असे मंत्री माविन यांनी स्पष्ट केले.
राज्यात ३३,८१३ घरांना ईएचएन क्रमांक देण्यात आला आहे तर अद्याप ८ ते १० हजार घरांनी हा क्रमांक घेतलेला नाही. घरपट्टी गोळा करण्यासह बेकायदेशीर गोष्टी रोखण्यासाठी आवश्यक ती पाऊले उचलली जातील, असे आश्वासन मंत्री गुदिन्हो यांनी सभागृहात दिले. घरांना ईएचएन क्रमांक दिल्याने कर संकलनात मोठा फायदा झाल्याचे देखील गुदिन्हो यावेळी म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.