चार्जिंग स्टेशन Dainik Gomantak
गोवा

Tata Power: गोव्यातील EV धारकांसाठी महत्वाची बातमी; राज्यभरात टाटा उभारणार तब्बल 100 चार्जिंग स्टेशन्स

टाटाचे यापूर्वी राज्यात 50 चार्जिंग पॉईंट आहेत.

Pramod Yadav

अलिकडे वाढते प्रदुषण आणि इंधनाचे वाढते भाव यामुळे नागरिकांचा कल ईलेक्ट्रीक वाहने घेण्याकडे वाढला आहे. दुचाकीपासून चारचाकीपर्यंत अनेक लोक ईलेक्ट्रीक वाहने घेण्यास पसंती देत आहेत. ईलेक्ट्रीक वाहनांचा वाढता वापर लक्षात घेता, टाटा गोव्यात येणाऱ्या प्रमुख मार्गांवर 100 चार्जिंग स्टेशन्स उभारणार आहे.

टाटा पॉवरच्या माध्यमातून या चार्जिंग स्टेशनची उभारणी केली जाणार आहे. टाटाचे यापूर्वी राज्यात 50 चार्जिंग पॉईंट आहेत. त्यात आणखी 100 चार्जिंग स्टेशन्सची वाढ केली जाणार आहे. याचा फायदा गोवेकरांसह राज्यात मोठ्या प्रमाणावर येणाऱ्या पर्यटकांना देखील होणार आहे.

टाटा राज्य सरकारसोबत याबाबत सकारात्मक पद्धतीने काम करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. गोव्याला जोडणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय मार्गावर ही चार्जिंग स्टेशन्स असतील.

गोव्यातून मुंबई, पुणे आणि कारवार या मर्गावर चार्जिंग स्टेशन्स असतील अशी माहिती समोर आली आहे. राज्य सरकारच्या वतीने निर्देशित केलेल्या 50 ठिकाणी सुरूवातीला चार्जिंग स्टेशन्स उभारली जातील. जागा निश्चिती करण्यासाठी राज्य सरकारने राज्य उर्जा विकास संस्था स्थापन केली आहे. चार्जिंग स्टेशन्सच्या उभारणीसाठी राज्य सरकारच्या वीज खात्याशी देखील चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sexual Harassment Case: मनोरंजन विश्वात खळबळ! 'महाभारत' फेम 'भीम' सौरव गुर्जरला अटक; लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली 14 दिवसांची कोठडी

Madgaon Massacre 1890: स्मरण मडगाव हत्याकांडाचे! 21 सप्टेंबर 1890 रोजी मतदानाचा अधिकार मागणाऱ्या निःशस्त्र गोवेकरांवर गोळीबार; 23 जणांचा बळी

Child Writer: 'गौरवी, असेच आणखी लिहीत जा'; 10 वर्षांच्या बाललेखिकेच्या 29 निबंधांना मुख्यमंत्र्यांची दाद, पहिल्या पुस्तकाचे प्रकाशन

Asian Games Final 2026: हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया रचणार इतिहास? फायनलसाठी भारताची ताकदवान फौज तयार; 'अशी' असणार संभाव्य प्लेइंग-11

Fire Case: आगीपूर्वी घराजवळ बादली घेऊन आलेला कोण? 2 मिनिटांत बादलीशिवाय परतला; दमोने कुटुंबातील सहा मृत्यूंच्या तपासाला नवे वळण

SCROLL FOR NEXT