दोन केंद्रीय मंत्री आज गोव्यात; दोन वेगवेगळ्या परिषदांना करणार संबोधित

केंद्रीय संरक्षणमंत्री आणि केंद्रीय कायदामंत्री आज गोव्यात आहेत.
rajnath singh and kiren rijuju
rajnath singh and kiren rijujuDainik Gomantak

गोव्यात आज (सोमवार, दि.06) दोन केंद्रीय मंत्री असून, ते दोन वेगवेगळ्या परिषदांना संबोधित करणार आहेत. केंद्रीय संरक्षणमंत्री आणि केंद्रीय कायदामंत्री आज गोव्यात असतील, त्यापैकी कायदामंत्री किरण रिजिजू रविवारी रात्री गोव्यात दाखल झाले आहेत. दाबोळी विमानतळावर राज शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी रिजिजू यांचे स्वागत केले.

कायदामंत्री किरण रिजिजू गोव्यात होत असलेल्या 23 व्या कॉमनवेल्थ कायदा परिषदेच्या उद्धाटन समारंभला उपस्थिती लावणार आहेत. यावेळी कायदा परिषदेला रिजिजू संबोधित करतील. कॉमनवेल्थ परिषद कायदातज्ञ आणि अभ्यासकांना व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध महत्त्वाच्या मुद्द्यांवर विचारमंथन करते. असे ट्विट किरण रिजिजू यांनी केले आहे.

rajnath singh and kiren rijuju
Ferry Boat: राज्यातील काही फेरीबोटींची अवस्था बिकट

मंत्री माविन गुदिन्हो यांनी दाबोळी विमानतळावर किरण रिजिजू यांचे स्वागत करतानाचे फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत.

rajnath singh and kiren rijuju
Cars Gutted In Fire: आगीचे सत्र सुरूच; वास्कोत चार चारचाकी जळून खाक

तसेच, नौदल कमांडर्ससाठी लष्करी-सामरिक पातळीवर सुरक्षेच्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी, नौदल कमांडर्स परिषद 2023 चा पहिला टप्पा 06 मार्चपासून सुरू होत आहे. गोव्यात होत असलेल्या या परिषदेच्या पहिल्या दिवशी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हजेरी लावणार असून, ते आय एन एस विक्रांतच्या नौदल कमांडर्सना संबोधित करतील.

परिषदेचा पहिला टप्पा समुद्रात आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे प्रथमच भारताची पहिली स्वदेशी विमानवाहू नौका आय एन एस विक्रांत जहाजावर ही परिषद होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com