Tashkent To Goa Flight Dainik Gomantak
गोवा

Tashkent To Goa Flight: ताश्कंद ते गोवा थेट विमानसेवा सुरु होणार; ''जगभरातील पर्यटकांना...''

Tashkent To Goa Flight: गोव्याने नवीन आंतरराष्ट्रीय मार्गाचे स्वागत केले आहे. उझबेकिस्तान एअरवेजने ताश्कंद-मोपा फ्लाइट्सची सुरुवात केली.

Manish Jadhav

गोव्याने नवीन आंतरराष्ट्रीय मार्गाचे स्वागत केले आहे. उझबेकिस्तान एअरवेजने ताश्कंद-मोपा फ्लाइट्सची सुरुवात केली. उझबेकिस्तान एअरवेजने अधिकृतपणे ताश्कंदहून गोव्याला थेट उड्डाणांची घोषणा केली आहे. ही प्लाइट 27 ऑक्टोबर 2024 पासून आठवड्यातून दोनदा चालवली जाईल. अत्याधुनिक एअरबस A320 निओ विमानाद्वारे ही सेवा दिली जाईल, जी ताश्कंदला मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ (मोपा) शी जोडेल, जी उझबेकिस्तान आणि गोव्यातील पर्यटन आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी नवीन मार्ग खुले करेल.

दरम्यान, उझबेकिस्तानच्या दूतावास तसेच ताश्कंदमधील भारतीय दूतावासाच्या महत्त्वपूर्ण सहकार्यामुळे या प्लाइटची सुरुवात झाली आहे. गोवा पर्यटन विभागाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. गोव्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवण्याच्या दृष्टीने गोवा पर्यटन विभाग ताश्कंद आंतरराष्ट्रीय पर्यटन मेळाव्यात (TITF) देखील सहभागी होईल.

पर्यटन मंत्री रोहन ए. खवंटे यांनी या प्लाइटचे स्वागत केले. पर्यटनमंत्री खवंटे म्हणाले की, “ताश्कंदहून गोव्याला थेट प्लाइट सुरु होणे हा मध्य आशियाशी गोव्याला जोडण्याचा एक मोठा टप्पा आहे. ही नवीन जोडणी केवळ गोव्याच्या पर्यटनालाच चालना देणार नाही, तर उझबेकिस्तानशी आपले सांस्कृतिक संबंधही मजबूत करेल. आम्ही जगभरातील पर्यटकांना गोव्याशी जोडण्यासाठी कटीबद्ध आहोत.”

हा नवीन मार्ग गोव्याच्या पर्यटन क्षेत्राच्या विस्ताराच्या दृष्टीने व्यापक धोरणाचा भाग आहे. त्याचबरोबर गोवा पर्यटन विभाग उझबेकिस्तानमधून येणाऱ्या पर्यटकांचे स्वागत करण्यास उत्सुक असल्याचे यावेळी खवंटे म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Assembly Election 2027: अटी, शर्ती आणि उमेदवारीचा कट! पार्सेकर अधांतरी, बाबूशना बळ; भाजपच्या रणनीतीत पणजी, मांद्रे, म्हापसा केंद्रस्थानी

Horoscope 10 July 2026: आज नशिबाची शंभर टक्के साथ! 'या' राशींवर होणार पैशांचा पाऊस; ग्रहांची नक्षत्रांमधील स्थिती करणार श्रीमंत

Goa Crime: गोव्यात माणुसकीला काळिमा! 85 वर्षीय वृद्धेवर घरात घुसून लैंगिक अत्याचार; नुवेत खळबळ

Viral Video: ट्रेनसमोर अचानक आली अन्...; महिलेचा थरारक ड्रामा व्हायरल; नेटकरी म्हणाले, "ही लोको पायलटची बायको तर नाही ना?"

Karnataka Accident: कर्नाटकात काळजाचा थरकाप उडवणारा अपघात! ट्रक-क्रूझरच्या भीषण धडकेत 6 तरुणांचा जागीच मृत्यू; 3 जण मृत्यूशी देतायेत झुंज

SCROLL FOR NEXT