Court Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: ...अखेर शिरोडकर खुनी हल्लाप्रकरणी टारझन-सागर यांना जामीन

दैनिक गोमन्तक

Goa Attemp To Murder Case: हडफडे-नागोवा येथे रवी शिरोडकर याच्यावरील खुनी हल्ला प्रकरणातील संशयित टारझन पार्सेकर व सागर पाटील या दोघांची मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सशर्त जामिनावर सुटका केली.

गेल्या दहा महिन्यांपासून ते कोठडीत आहेत. या जामीन काळात त्याना उत्तर गोव्यात प्रवेश न करण्याची अट घालण्यात आली आहे.

गोवा खंडपीठाने या दोघांना जामीन देताना वैयक्तिक 25 हजारांची हमी तसेच तत्सम रक्कमेचे एक किंवा दोन हमीदार दिवाणी न्यायालयाच्या समाधानानुसार द्यावेत.

न्यायायातील खटल्यावरील सुनावणीवेळी उपस्थित राहण्यास त्याना मुभा असेल. त्यांनी राहत असलेला पत्ता तसेच संपर्कसाठी मोबाईल क्रमांक तपास अधिकाऱ्यांना सादर करावा.

न्यायालयाच्या पूर्वपरवानगीशिवाय गोव्याबाहेर जाऊ नये. 15 दिवसांतून एकदा दर गुरुवारी हणजूण पोलिसांत 10 ऑगस्ट 2023 पासून सकाळी 11 ते दुपारी 12 वाजेपर्यंत खटल्यावरील सुनावणी संपेपर्यंत हजेरी लावावी.

साक्षीदारांना धमकावण्याचा किंवा पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न करू नये, असे जामीन दिलेल्या आदेशात खंडपीठाने म्हटले आहे.

नाईकवाडा - कळंगुट येथे राहत असलेला रवी शिरोडकर व संशयित टारझन पार्सेकर यांच्या रेंट ए बाईक व्यवसायावरून मतभेद होते. टारझन याने अनेकदा त्याला धमक्याही दिल्या होत्या.

गेल्यावर्षी शिरोडकर हे आपल्या मित्रांसमवेत वाढदिवसाची पार्टी आटोपून परतत असताना हडफडे - नागोआ येथे पार्सेकर याने त्याला अडविले. यावेळी पार्सेकर इतर साथीदार होते.

या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी टारझन पार्सेकर व सागर पाटील याच्यासह पंधराजणांना अटक केली होती. टारझन व सागर हे वगळता इतरांना न्यायालयाने जामीन दिला होता.

या दोन्ही संशयितांविरुद्ध अनेक गुन्हे आहेत. त्यांची पार्श्‍वभूमी गुन्हेगारीची आहे, हे सत्य असले तरी ते गेले दहा महिने कोठडीत आहेत. खटल्यावरील सुनावणी कधी सुरू होईल व संपेल याची माहिती नाही.

इतर सर्व संशयित जामिनावर आहेत व नैसर्गिक न्याय देण्याच्या दृष्टीने कठोर अटी घालून त्याना जामीन देणे योग्य आहे, असे निरीक्षण न्यायालयाने केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

SCROLL FOR NEXT