Sexual Assault Case Dainik Gomantak
गोवा

Sexual Assault Case: तरुण तेजपालला मोठा झटका! लैंगिक शोषण प्रकरणात हायकोर्टानं ठरवलं दोषी

Tarun Tejpal Convicted Sexual Assault Case: न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या न्यायपीठाने तरुण तेजपालला दोषी ठरवले. 2021 मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्यांभावी तरुण तेजपालची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती.

Manish Jadhav

Tarun Tejpal Convicted Sexual Assault Case: तहलका मॅगझिनचा माजी संपादक तरुण तेजपाल याच्याविरोधात तब्बल 13 वर्षांपासून प्रलंबित असलेल्या अत्यंत हायप्रोफाईल लैंगिक शोषण प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने अत्यंत महत्त्वाचा निकाल दिला. न्यायमूर्ती नीला गोखले आणि न्यायमूर्ती अमित जामसंडेकर यांच्या न्यायपीठाने तरुण तेजपालला दोषी ठरवले. 2021 मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्यांभावी तेजपालची सर्व आरोपांतून निर्दोष मुक्तता केली होती.

सत्र न्यायालयाच्या या निर्णयाविरोधात गोवा सरकारने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज्य सरकारची ही अपील याचिका स्वीकारत उच्च न्यायालयाने ट्रायल कोर्टाचा जुना निकाल पूर्णपणे रद्दबातला ठरवला.

न्यायालयाने आपला महत्त्वपूर्ण निकाल सुनावताना स्पष्ट केले की, ट्रायल कोर्टाने दिलेला पूर्वीचा निर्णय त्रुटीपूर्ण होता. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा तो आदेश रद्द करत तेजपालला या गंभीर गुन्ह्यात दोषी घोषित केले. तसेच, शिक्षेच्या प्रमाणावर आजच युक्तिवाद पूर्ण केल्यास न्यायालय त्यावर त्वरित निर्णय देईल, असेही खंडपीठाने स्पष्ट केले होते. या निकालामुळे गेल्या अनेक वर्षांपासून कायदेशीर लढाई लढणाऱ्या पीडित महिलेला मोठा दिलासा मिळाला असून, भारतीय न्याय व्यवस्थेवर लोकांचा विश्वास पुन्हा एकदा दृढ झाला.

हे संपूर्ण प्रकरण नोव्हेंबर 2013 मधील आहे, जेव्हा तहलका मॅगझिनमध्ये तरुण तेजपालसोबत काम करणाऱ्या एका महिला (Women) सहकाऱ्याने त्याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. गोव्यातील एका आलिशान पंचतारांकित हॉटेलच्या लिफ्टमध्ये तरुण तेजपालने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोप पीडितेने केला होता. त्यावेळी देशभरात हे प्रकरण चांगलेच गाजले होते. आरोप झाल्यानंतर तेजपालने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती, मात्र न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावली. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2013 रोजी त्याला गोव्यात अटक करण्यात आली होती.

सुमारे साडेसात वर्षांच्या प्रदीर्घ सुनावणीनंतर, 2021 मध्ये सत्र न्यायालयाने पुराव्यांच्या कमतरतेचे कारण देत तरुण तेजपालची सर्व आरोपांतून मुक्तता केली होती. मात्र, सरकारी पक्षाने सत्र न्यायालयाचा हा निर्णय चुकीचा आणि पुराव्यांकडे दुर्लक्ष करणारा असल्याचे सांगत उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या या नव्या निकालामुळे तेजपालच्या अडचणीत मोठी वाढ झाली असून, आता न्यायालय त्याला काय शिक्षा सुनावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

क्रिकेटमध्ये मोठा उलटफेर! सचिन तेंडुलकरचा 'अशक्य' वाटणारा विक्रम मोडला; बॅननंतर परतलेल्या टेलरनं रचला इतिहास

Horoscope: गणेशोत्सवात 'या' 4 राशींचे भाग्य उजळणार! गणपती बाप्पाच्या विशेष कृपेने बुद्धी, करिअर आणि पैशांच्या बाबतीत मिळणार प्रचंड लाभ

Asia Cup Trophies: 'ट्रॉफी चोरा'कडून भारताच्या विजेतेपदाची ट्रॉफी कधी मिळणार? BCCI नं स्पष्टच सांगितलं; आंतरराष्ट्रीय स्तरावर मोहसिन नक्वीची पुन्ही नाचक्की

Viral Post: 1.5 कोटींची नोकरी सोडली; आता महिन्याला फक्त 500 रूपये कमाई; तरीही तरुणी म्हणते, 'हा निर्णय चुकीचा नाही' VIDEO

Lashkar e Taiba Commander Killing: पाकड्यांच्या 'टेरर फॅक्टरी'ला मोठा हादरा! हाफिज सईदचा जवळचा दहशतवादी कराचीत ठार; अज्ञात हल्लेखोरांचा थरारक गोळीबार

SCROLL FOR NEXT