Worms In Mid-Day Meal Dainik Gomantak
गोवा

Worms In Mid-Day Meal: माध्यान्ह आहाराचे कंत्राट एजन्सींना देण्यासाठी स्वयंसाहाय्य गटांना लक्ष्य

Worms In Mid-Day Meal: सरकारकडे पौष्टिक मूल्याचा तपशील नाही

दैनिक गोमन्तक

Worms In Mid-Day Meal: गेल्या विधानसभा अधिवेशनात मी मुख्यमंत्री तथा शिक्षणमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना प्रश्न विचारले होते. माझ्या एका प्रश्नाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी अन्न व औषध संचालनालयाकडून माध्यान्ह आहारातील पोषण मूल्याचे मूल्यांकन किंवा तपासणी केली जात नसल्याचे स्पष्ट केले होते.

आरोग्यमंत्र्यांनी शिक्षण खात्याकडे माध्यान्ह आहाराच्या पौष्टिक मूल्याचा तपशील नसल्याचेही उघड केले होते, असा गौप्यस्फोट विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी विरोधक केवळ माध्यान्ह आहार देणाऱ्या स्वयंसाहाय्य संस्थांच्या देयकांवर प्रश्न विचारतात, गुणवत्तेवर नाही असे विधान केले होते. त्यावर प्रतिक्रिया देताना युरी आलेमाव यांनी भाजप सरकारला आता बाहेरील एजन्सींना हे कंत्राट देण्याचे असल्याने स्थानिक स्वयंसाहाय्य गटांना लक्ष्य करण्यात येत आहे, असा गंभीर आरोप केला.

विधानसभेत शिक्षण खात्याने माझ्या एका प्रश्नाला दिलेल्या उत्तरात माध्यान्ह आहार पुरविणाऱ्या स्वयंसाहाय्य गटाचे स्वयंपाकघर तपासण्यासाठी दोन पोषण तज्ज्ञ नियुक्त केल्याचे म्हटले होते, मग इतके दिवस हे तज्ज्ञ काय करत होते? आहाराच्या दर्जाची आठवण लोकांनी सरकारला का करून द्यावी लागते? असा सवाल युरी आलेमाव यांनी विचारला आहे.

अधिकाऱ्यांवरही कारवाई करा’

‘फोंडा येथे आहारात अळी सापडल्यानंतर जनतेच्या संतापानंतर एफडीएने विद्यार्थ्यांना अळी असलेले अन्न पुरवल्याबद्दल संबंधित स्वयंसाहाय्य गटावर कारवाई केली असली, तरी कर्तव्य बजावण्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. सरकार निवडकपणे केवळ स्वयंसाहाय्य गटालाच लक्ष्य करू शकत नाही, असा दावा युरी आलेमाव यांनी केला. माध्यान्ह आहार तयार करणे आणि त्याचे वितरण यावर लक्ष ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. योग्य आहार पुरविण्यास शिक्षण खातेही तितकेच जबाबदार आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lessons from Animals: प्राण्यांकडूनही शिकता येतात जीवनाचे धडे! मुंग्यांची शिस्त, पक्ष्यांची मेहनत अन् निसर्गाची जादू

Bangladesh Resort Fire: बांगलादेशात रिसॉर्टला भीषण आग, 10 जणांचा होरपळून मृत्यू; जीव वाचवण्याची संधीच मिळाली नाही VIDEO

Trigrahi Yog 2026: ग्रहांच्या फेरबदलाचा मोठा चमत्कार! त्रिग्रही आणि बुधादित्य योगाच्या संयोगाने उजळणार 3 राशींचे भाग्य; होणार अफाट धनलाभ

INS Samarthak Warship: भारताची पहिली बहुउद्देशीय युद्धनौका 'समर्थक' नौदलात दाखल; सागरी सुरक्षा होणार अधिक मजबूत!

Hero च्या दोन नव्या बाइक्स लॉन्च! किंमत 1.27 लाखांपासून सुरू, क्रूझ कंट्रोलसह मिळणार अनेक भन्नाट फीचर्स

SCROLL FOR NEXT