Goa Tarang Utsav Pernem Dainik Gomantak
गोवा

Goa Tarang Utsav : पेडणेतील आगळावेगळा तरंगोत्सव

नवरात्रीच्या दिवसात गोव्यातील पेडणे तालुक्यात ठिकठिकाणी तरंगोत्सव साजरे होत असतात.

गोमन्तक डिजिटल टीम

Goa Tarang Utsav : नवरात्रीच्या दिवसात गोव्यातील पेडणे तालुक्यात ठिकठिकाणी तरंगोत्सव साजरे होत असतात. प्रफुल्लीत मनांनी पेडणेकर आपापल्या गावातल्या ग्रामदेवतांचे तरंग मिरवतात व त्यांच्याकडून कौल घेतात. पार्से, हरमल, पालये, उगवे, चोपडे या ठिकाणी या दिवसात तरंगोत्सव पार पडतात. आपल्या कुलदेवतांचा, ग्रामदेवतांचा आशिर्वाद मिळवण्यासाठी पेडणेकर भाविकतेने आपापल्या गावी या वेळी हजर राहणे पसंत करतात.

तरंगांना देवासारखाच मान असतो. देवाचे प्रतिनिधी बनून डौलाने मिरवीत ते आपली परिक्रमा आक्रमत असतात. देव भुतनाथ आणि देव रवळनाथ यांच्या तरंगानिशी तिथल्या भगवती मंदिरात प्रसिध्द ‘पेडण्याची पुनव’ साजरी होत असतानाच, पार्से-आगरवाडा परिसरात, त्रैवार्षिक साजऱ्या होणाऱ्या ‘देवाची पुनव’ या उत्सवाच्या निमित्ताने पार्से येथील श्री देवी भगवतीचे आपल्या तरंगासहित आगरवाडा येथे आगमन होते. भाविक रात्रभर जागून उत्साही वातावरणात तिचे जल्लोषाने स्वागत करतात. ढोल-ताशांच्या गजरात आणि शेकडो भाविकांच्या उपस्थितीत  आगरवाडा-पार्से परिसर गजबजून जातो. यंदा आगरवाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा रथ आकर्षणाचा केंद्र ठरला.

विशिष्ट्य पध्दतीने सजवलेली ही पारंपरिक तरंगे रात्रीच्या वेळेस पार्से येथील श्री भगवती मंदिरातून वाजतगाजत पार्सेहून निघतात. एका विशिष्ट लईच्या ठेक्यावर पदन्यास करत ती आगरवाडा येथे आणली जातात. या उत्सवासाठी आगरवाडा-पार्से दरम्यानचा रस्ता स्वच्छ करण्यात केला जातो. त्यावर सडा-रांगोळीने सजावट करण्यात येते. रात्रभर जागरण करीत महिला देवीच्या मार्गावर आकर्षक रांगोळी काढतात. कमानी आणि विद्युत रोषणाईने सजलेला रस्ता दुतर्फा आकर्षक बनतो.

यानंतर पहाटे 'हर हर महादेव'च्या गजरात श्री सातेरी मंदिरात ही तरंगे  पोहोचताच त्या ठिकाणी पारंपरिक विधी पार पाडले जातात. देवी भगवतीचे सर्व महाजन, पदाधिकारी, मानकरी सेवेकरी यांचे पारंपरिकरित्या स्वागत करतात. श्री सातेरी मंदिरात दर्शनासाठी ठेवण्यात आलेल्या श्री देवी भगवतीच्या कलशाचे आणि तरंगांचे भाविकांनी दर्शन घेतात. सुवासिनींकडून खणा-नारळांनी देवीची ओटी भरली जाते. ‘कौलाचो कुंनगो’ या पारंपारिक स्थानी सर्वासाठी कौल दिल्यानंतर सायंकाळी ही तरंगे पार्से येथे जाण्यास माघारी फिरतात. यानंतर सकाळी श्री भगवती मंदिर पार्से येथे सामुहिक कौलाने या उत्सवाची सांगता होते.

चोपडे येथील तरंगोत्सव

चोपडे येथील श्री दर्यासम्राट वेताळ देवस्थानात तरंगोत्सवास नवमीच्या दिवशी प्रारंभ होतो. यानंतर कोजागिरी पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी श्री देव रवळनाथाच्या प्रांगणात कौलोत्सावाने या उत्सवाची सांगता होते. दसरोत्सवासाठी चोपडे येथील श्री रवळनाथ मंदिरात श्री देव रवळनाथ, श्री देव भूतनाथ आणि देवी भूमिका यांची तीन तरंगे सजवण्यात येतात. श्री रवळनाथ मंदिरातून सकाळी ही तरंगे प्रथम वाजत गाजत शिवलग्नासाठी कलमाजवळील ठरलेल्या पारंपारिक जागेत जातात. त्याठिकाणचा शिवलग्नविधी आटोपल्यानंतर ती श्री भूमिका मंदिरात वास्तव्यासाठी जातात. त्या ठिकाणी सुवासिनीकडून ओटी भरण्याचा कार्यक्रम होतो व उपस्थित भाविकांना ‘अवसारी कौल’ दिला जातो. त्यानंतर ही तरंगे दोन दिवसांसाठी चोपडे येथील श्री दर्यासम्राट वेताळ मंदिरात वास्तव्यासाठी जातात. तिथले वास्तव्य आटोपल्यानंतर श्री कालिका मंदिराजवळ येऊन त्यांनी त्या ठिकाणी भाविकांना कौल देतात. तिथून त्यानंतर ती खुर्बान वाडा येथील सटी  देवस्थानाजवळ जाऊन त्या ठिकाणी आवश्यक विधी झाल्यानंतर सेवेकऱ्यांना पारंपारिक कौल देतात. कौल दिल्यानंतर ही तरंगे वास्तव्यासाठी श्री देव कुळकार मंदिरात जातात. त्यानुसार रात्री त्यांचे वास्तव्य श्री देव कुळकार मंदिरात असते. यानंतर त्याठिकाणी विविध धार्मिक विधी नैवेद्य केल्यानंतर कुळकार मंदिराजवळ कौल दिले जातात. यानंतर ही तरंगे श्री रवळनाथ मंदिराजवळील पारंपारिक जागेत येऊन उपस्थित भाविकांना अवसारी कौल देतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दोनवेळा घर कोसळले, मदत नाही फक्त आश्वासनं मिळाली; कोलवाळमधील 65 वर्षीय महिलेचा एकाकी संघर्ष

Disneyland In India: भारतात होणार ‘डिस्नेलँड’, 500 एकर परिसरातल्या थीम पार्कला ‘या’ राज्याने दिली मंजुरी

Crocodiles Viral Video: हा कसला वेडेपणा! चक्क मगरीला दुचाकीवर घेऊन प्रवास, व्हिडिओ पाहून म्हणाल, खतरनाक...

Viral Video: भर मैदानात घुसला 'बिनतिकीट' पाहुणा! कुत्र्याच्या एंट्रीनं खेळाडूंमध्ये घबराट, पाहा VIDEO

Goa News Live Updates: पर्ये मॅनेजमेंट कॉलेज जवळ रात्री चाकू हल्ला

SCROLL FOR NEXT