Circle of Joy Dainik Gomantak
गोवा

Circle of Joy: तार जंक्शन आता सर्कल ऑफ जॉय म्हणून ओळखले जाणार

सुशोभिकरण करुन नवीन साज चढवण्यात आलेल्या तार-म्हापसा येथील जंक्शनचा परिसर यापुढे ‘सर्कल ऑफ जॉय’ या नावाने ओळखला जाणार आहे.

Kavya Powar

सुशोभिकरण करुन नवीन साज चढवण्यात आलेल्या तार-म्हापसा येथील जंक्शनचा परिसर यापुढे ‘सर्कल ऑफ जॉय’ या नावाने ओळखला जाणार आहे.

दिवाळीच्या पूर्वसंध्येला म्हणजे, ११ नोव्हेंबर रोजी माजी आमदार ग्लेन टिकलो, बस्तोडा पंचायतीचे सरपंच सुभाष मोरजकर तसेच इतर पंचसदस्यांच्या उपस्थितीत नूतनीकरण केलेल्या या सर्कलचे उद्घाटन होणार आहे. माजी सरपंच सावियो मार्टीन्स यांनी याविषयी माहिती दिली.

जंक्शनच्या परिसराच्या सुशोभीकरणाच्या कामाला गेल्या वर्षी सुरवात झालेली. सर्कलवर दुभाजकसह वाहतूक बेट, फुटपाथ उभारली या कामासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च करण्यात आलाय. सदर काम सीएसआर योजनेअंतर्गत करण्यात आल्याची माहिती मार्टीन्स यांनी दिली.

वाहतूक बेटावर पारंपरिक खेळांचे दर्शन घडवणारे लहान मुलांचे पुतळे बसवण्यात आले आहेत. सीसीटीव्ही कॅमेर्‍यांसोबत व्हायफाय सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. याचे नियंत्रण पंचायत कार्यालयात असणार आहे. त्याचबरोबर रस्त्याची डागडुजी हाती घेतली जाणार आहे. या सर्व कामांना रितसर परवानगी घेऊन घेतल्याचे मार्टीन्स म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'बर्च' प्रकरणाचा सस्पेन्स कायम! पोलिसांना निवडणूक ड्युटी; अजय गुप्ताच्या जामिनावर फैसला सोमवारी

Goa ZP Election: "आम्हाला एकही उमेदवार नको असेल तर?" बॅलेट पेपरवर 'नोटा'चा पर्याय नाही; सुर्ल साखळीतील मतदारांची नाराजी

Salt Production Goa: गोव्यात एकेकाळी 75 पेक्षा अधिक मिठागरे होती, 130 प्रकारची मिठे होती; गोमंतकीयांची खरी चव नष्ट होत चालली आहे

Goa Crime: 2024 साली संपला व्हिसा, तरी गोव्यात भाड्याच्या खोलीत मुक्काम; 2 परदेशी नागरिकांची न्यायालयीन कोठडीत रवानगी

Goa ZP Election 2025 Live Update: तिन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल 'ढवळीकरांना' खात्री

SCROLL FOR NEXT