All India Badminton Ranking Dainik Gomantak
गोवा

Tanisha Crasto: गोव्याच्या तनिशाचा सीनियर बॅडमिंटनमध्ये 'डबल' धमाका; महिला दुहेरी, मिश्र दुहेरीत बाजी

किशोर पेटकर

All India Badminton Ranking: गोव्याची आंतरराष्ट्रीय बॅडमिंटनपटू तनिशा क्रास्टो हिने हरियानात झालेल्या अखिल भारतीय सीनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी विजेतेपदास गवसणी घातली. महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत तिने बाजी मारली.

तनिशाना महिला दुहेरीत अश्विनी पोनाप्पा हिच्यासह, तर मिश्र दुहेरीत के. साई प्रतीक याच्या साथीत विजेतेपद प्राप्त केले. अंतिम लढतीत तनिशा व अश्विनी जोडीने राधिका शर्मा व तन्वी शर्मा जोडीस २१-१३, २१-१४ असे पराजित केले. मिश्र दुहेरीत तनिशा व साई प्रतीकने हरिहरन अम्साकरुणन व व्ही. एस. वर्षिनी जोडीस २१-१९, २१-१३ असे हरविले.

या स्पर्धेत गोव्याची आणखी एक महिला खेळाडू अनुरा प्रभुदेसाई दुहेरीत सहभागी झाली होती. अनुरा व रिया मुखर्जी जोडीस उपांत्यपूर्व फेरीत माघार घ्यावी लागली. राधिका शर्मा-तन्वी शर्मा जोडीने त्यांना २१-१८, १८-२१, २१-१७ असे नमविले.

लक्षणीय कामगिरी

अखिल भारतीय सीनियर मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत दुहेरी किताब पटकावलेल्या तनिशाचे गोवा बॅडमिंटन असोसिएशनने अभिनंदन केले आहे. तनिशाचा मिश्र दुहेरीतील नियमित सहकारी ईशान भटनागर याला दुखापत झाली, त्यामुळे या जोडीस पुण्यात झालेल्या राष्ट्रीय सीनियर स्पर्धेस मुकावे लागले. मात्र आता तनिशाने जोरदार मुसंडी मारली, ही बाब आश्वासक आहे.

आगामी आशियाई क्रीडा स्पर्धा आणि सुदिरमन कप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर तनिशाने सहकारी खेळाडूंसह बजावलेली कामगिरी लक्षणीय आहे. या कामगिरीचे मानांकन गुण भारतीय संघ निवड चाचणीत महत्त्वपूर्ण ठरतील, असे गोवा बॅडमिंटन संघटनेचे सचिव संदीप हेबळे यांनी सांगितले. त्यांनी तनिशाचे कौतुक करताना तिचा मिश्र दुहेरीतील सहकारी ईशान लवकर तंदुरुस्त होण्याचा विश्वास प्रकट केला.

"हरियानातील अखिल भारतीय बॅडमिंटन मानांकन स्पर्धेतील विलक्षण कामगिरीबद्दल गोव्याची भारतीय स्टार खेळाडू तनिशा क्रास्टो हिचे अभिनंदन. दुहेरी आणि मिश्र दुहेरी विजेतेपद ही उल्लेखनीय उपलब्धी आहे." अशा शब्दात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT