CM Stalin
CM Stalin Dainik Gomantak
गोवा

हिंदी येत नाही म्हणून गोवा विमानतळावर तमिळ महिलेचा छळ; CM स्टॅलिन यांनी आरोप करत व्यक्त केली चिंता

Pramod Yadav

M.K Stalim React Over Hindi Language By CISF Constable At Dabolim Airport: हिंदी येत नसल्याने दाबोळी विमानतळवर CISF कर्मचाऱ्याने तामिळनाडूच्या महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याचा प्रकार समोर आला. हिंदी राष्ट्रीय भाषा असून गुगल करुन खात्री करा असे तो कर्मचारी महिलेला म्हणाला.

यावरुन तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी चिंता व्यक्त करत, हिंदी येत नाही म्हणून गोवा विमानतळावर तमिळ महिलेचा छळ केल्याचा आरोप त्यांनी केला.

"बिगर हिंदी भाषिक राज्यातील प्रवाशांचा हिंदी येत नसल्यामुळे CISF कर्मचार्‍यांकडून छळ होत असल्याच्या आणि हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा असल्याचा चुकीचा समज स्वीकारण्यास भाग पाडण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना चिंताजनक आहेत."

"शर्मिला यांनी निदर्शनास आणल्याप्रमाणे, ही केवळ एका व्यक्तीशी संबंधित समस्या नसून, असंवेदनशीलता दर्शवते. प्रवाशांशी कसे वागावे आणि आपल्या देशाच्या समृद्ध सांस्कृतिक आणि भाषिक विविधतेबद्दल कर्मचार्‍यांना शिक्षण देण्यासाठी सीआयएसएफने त्वरित पावले उचलणे अत्यावश्यक आहे."

"भारतात भेदभावाला स्थान नाही; सर्व भाषांचा समान आदर करूया," असे ट्विट तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी केले आहे.

हिंदी भाषा लादणे बंद करा असा हॅशटॅग वापरुन स्टॅलिन यांनी केंद्रीय गृहमंत्रालय आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हे ट्विट टॅग केले आहे.

काय आहे प्रकरण?

चेन्नईतील महिलेला दाबोळी विमानतळावर CISF कर्मचाऱ्याने हिंदी भाषा शिकण्याचा विचित्र सल्ला दिला. तसेच, हिंदी राष्ट्रीय भाषा असून गुगल करुन तपासून पाहा असेही या कर्मचारी म्हणाला असा आरोप महिलेने केला. महिलेने याप्रकरणी विमानतळ प्रशासनाकडे तक्रार केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT